मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  SRK Family Photos: आर्यन, सुहाना अन् अबरामचा स्वॅग.. शाहरुख खानचे फॅमिली फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

SRK Family Photos: आर्यन, सुहाना अन् अबरामचा स्वॅग.. शाहरुख खानचे फॅमिली फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 18, 2023 01:14 PM IST

Shah Rukh Khan Family Photos Viral: किंग खानच्या कुटुंबाचे काही न पाहिलेले फोटो सध्या इंटरनेट विश्वात व्हायरल होत आहेत. शाहरुख खानला त्याच्या कुटुंबासह, विशेषत: मुलांसोबत फोटो पोज देताना पाहणं ही चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे.

Shah Rukh Khan Family Photos
Shah Rukh Khan Family Photos

Shah Rukh Khan Family Photos Viral: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. नुकताच त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्या या चित्रपटाला लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. बॉलिवूडचा ‘किंग’ अशी ओळख असणारा शाहरुख खान हा ‘फॅमिली मॅन’ आहे. शाहरुख खानचे त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. यामुळेच लोक त्याला ‘फॅमिली मॅन’ असेही म्हणतात. काही दिवसांपूर्वी गौरी खानने त्यांचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये शाहरुखसोबत त्याचे संपूर्ण कुटुंब दिसले होते. या फोटोवर चाहत्यांनी प्रेमाच वर्षाव केला होता. दरम्यान, आता शाहरुखच्या कुटुंबाचे काही अनसीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

किंग खानच्या कुटुंबाचे काही न पाहिलेले फोटो सध्या इंटरनेट विश्वात व्हायरल होत आहेत. शाहरुख खानला त्याच्या कुटुंबासह, विशेषत: मुलांसोबत फोटो पोज देताना पाहणं ही चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे. नुकतेच या 'खानदान'चे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब अतिशय स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे. शाहरुख खान आणि त्यांच्या कुटुंबाचे काही फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील या फॅमिली फोटोंमध्ये खान कुटुंबाचा स्वॅग पाहायला मिळाला आहे.

बॉलिवूड किंग सुपरस्टार शाहरुख खान याच्या फॅन पेजने एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या फोटोत शाहरुखसोबत गौरी खान आणि त्यांची तिन्ही मुलं देखील दिसत आहेत. या फोटोमध्ये संपूर्ण कुटुंब ब्लॅक अँड व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहेत. शाहरुख खानचा हा फॅमिली फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यांच्या या फोटोला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले आहेत. यासोबतच चाहते हे फोटो जोरदार शेअर देखील करत आहेत.

चाहत्यांनी शाहरुख खानच्या फॅमिली फोटोला 'पठाण' फॅमिली असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे नेहमी गंभीर चेहरा घेऊन फिरण्यामुळे ट्रोल होणारा आर्यन खान या फोटोत मात्र मनमोकळेपणाने हसताना दिसत आहे.

IPL_Entry_Point