मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: लॉरेन्स बिष्णोईच्या धमकीनंतर कशी होती सलमान खानची प्रतिक्रिया? काय म्हणाला अभिनेता?

Salman Khan: लॉरेन्स बिष्णोईच्या धमकीनंतर कशी होती सलमान खानची प्रतिक्रिया? काय म्हणाला अभिनेता?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 21, 2023 10:18 AM IST

Salman Khan Death Threats: सलमानच्या सुरक्षेसाठी आता कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. आता पहिल्यांदाच या सगळ्या प्रकरणावर सलमान खानची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Salman Khan
Salman Khan

Salman Khan Death Threats: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या जीवाला सध्या धोका आहे. पुन्हा एकदा सलमान खानला धमक्या देण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी सलमान खानच्या टीमला धमकीचा ईमेल आला होता. या ईमेलनंतर सलमान खानच्या घराभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सलमानच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. आता पहिल्यांदाच या सगळ्या प्रकरणावर सलमान खानची प्रतिक्रिया समोर आली आहे. सलमानच्या एका जवळच्या व्यक्तीने त्याची प्रतिक्रिया कशी होती, हे सांगितलं आहे.

धमकीनंतर सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित ब्रार यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय पोलिसांनी सलमान खानला कोणतेही आऊटडोअर शूट किंवा इतर कोणतेही काम करण्यास मनाई केली आहे. सध्या सलमान खान मुंबईत नसून, आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्याचे कुटुंब सध्या प्रचंड चिंतीत झालं आहे. सगळ्यांनाच सलमान खानची काळजी वाटत आहे. त्यामुळे सलमान खानने सध्या शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सलमानच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, सलमान या धमकीला घाबरलेला नसून, तो सगळ्या गोष्टी अगदी सामान्य पद्धतीने घेत आहे. आपले कुटुंबात अजून चिंतेत पडू नये, याची काळजी सलमान घेत आहे. मात्र, कुटुंबाच्या आग्रहामुळे सलमानने बाहेरचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. आगामी चित्रपटाचे शूटिंग आणि प्रमोशनही तूर्तास थांबवले आहेत.

सध्या सलमान खानला असे वाटतेय की, या धमकीकडे जितके जास्त लक्ष दिले जाईल, तितके त्या व्यक्तीला वाटेल की, आपण आपले इप्सित साध्य केले आहे. जे व्हायचे ते होईल, असा त्याचा विश्वास आहे. सलमानला सशस्त्र रक्षकांशिवाय घराबाहेर पडू नये, असे देखील सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कुटुंबाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खान, वडील सलीम खान आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासह राहतो. सलमानला धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या संपूर्ण कुटुंबाला घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग