मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: धमकीनंतर सलमान खानला घराबाहेर पडण्यासही बंदी; पोलिसांकडून घेतली जातेय खबरदारी!

Salman Khan: धमकीनंतर सलमान खानला घराबाहेर पडण्यासही बंदी; पोलिसांकडून घेतली जातेय खबरदारी!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 20, 2023 05:31 PM IST

Salman Khan Death Threats: धमकीच्या ईमेलनंतर सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

Salman Khan
Salman Khan

Salman Khan Death Threats: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाला आहे. या धमकीनंतर सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित ब्रार यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय पोलिसांनी सलमान खानला कोणतेही आऊटडोअर शूट किंवा इतर कोणतेही काम करण्यास मनाई केली आहे. सध्या सलमान खान मुंबईत नसून, आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

अभिनेता सलमान खान सध्या मुंबईत नसून, तो कधी परतणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सलमानची सुरक्षा लक्षात घेऊन सध्या तो कुठे आहे, हे सांगण्यात आलेले नाही. सध्या सलमान त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी सलमान खानला कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जाण्यास, आऊटडोअर शूटिंग करण्यास किंवा कोणत्याही प्रमोशनल इव्हेंटमध्ये जाण्यास मनाई केली आहे.

यासोबतच सलमानला सशस्त्र रक्षकांशिवाय घराबाहेर पडू नये, असे देखील सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कुटुंबाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खान, वडील सलीम खान आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासह राहतो. सलमानला धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या संपूर्ण कुटुंबाला घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे.

सलमान खानच्या ऑफिसच्या मेल आयडीवर १८ मार्च रोजी हा मेल आला आहे. यात मॅटर क्लोज करायचा असेल तर फेस टू फेस चर्चा कर, नाहीतर पुढच्या वेळी झटका दिला जाईल, अशी धमकी सलमान खान याला दिली आहे. रोहित गर्ग नावाच्या आयडीवरुन हा धमकीचा मेल आला आहे. यात गँगस्टर गोल्डी ब्रारची नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी सलमान खानचंय सुरक्षेत आणखी वाढ केली असून, खबरदारीचा उपाय म्हणून त्याला सार्वजनिक कार्यक्रमांपासून सुरू राहण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

WhatsApp channel

विभाग