मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan OTT Release: ‘पठाण’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ओटीटीवर पाहायला मिळणार ‘ते’ सीन्स!

Pathaan OTT Release: ‘पठाण’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; ओटीटीवर पाहायला मिळणार ‘ते’ सीन्स!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 21, 2023 09:18 AM IST

Pathaan Releasing on OTT: रिलीजच्या २ महिन्यांनंतरही ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. आता या चित्रपटाचा आनंद चाहत्यांना घर बसल्या घेता येणार आहे.

Pathaan
Pathaan

Pathaan Releasing on OTT: बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या २ महिन्यांनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. आता या चित्रपटाचा आनंद चाहत्यांना घर बसल्या घेता येणार आहे. शाहरुख खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' उद्या म्हणजेच २२ मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत शाहरुख खानने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला. रिलीजच्या २ महिन्यांनंतर आता ‘पठाण’ ओटीटीवर रिलीज होणार आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित शाहरुख खानचा हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘पठाण’ २२ मार्च रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. सेन्सॉरने या चित्रपटातील काही दृष्यांना कात्री लावली होती. मात्र, ही दृश्य ओटीटीवर रिलीज होणाऱ्या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. ‘पठाण’ चित्रपटगृहात रिलीज होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने यातील काही सीन्स हटवले होते.

‘पठाण’ चित्रपटाबाबत बराच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाला या चित्रपटातील अनेक दृश्ये कापावी लागली होती. मात्र, ‘पठाण’ चित्रपट आता हा कोणताही सीन न कापता ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक खास सीन देखील पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये शाहरुख खान त्याला 'पठाण' हे नाव कसे पडले हे सांगताना दिसणार आहे.

शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट २५ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. ‘पठाण’ हा चित्रपट आजही लाखोंची कमाई करत आहे. रिलीजच्या ५० दिवसांनंतरही जगभरात ‘पठाण’चा प्रभाव कायम आहे. पठाण अजूनही यूके, यूएस, ऑस्ट्रेलिया, यूएई आणि कॅनडा यांसारख्या देशांमध्ये हाउसफुल कमाई करत आहे. ‘पठाण’ चित्रपटाने भारतात ६५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. तर, परदेशात १००० कोटींहून अधिकचा आकडा पार केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग