मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘पठाण’, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार

Pathaan: ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘पठाण’, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 15, 2023 07:56 PM IST

Pathaan: मीडिया रिपोर्ट्सनुसार, पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनाला ५६ दिवस पूर्ण झाल्यावर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

पठाण
पठाण (MINT_PRINT)

बॉलिवूड किंग शाहरुख खान याच्या ‘पठाण’ची छप्परफाड कमाई अजूनही सुरू आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला जवळपास ५० दिवस उलटले आहेत मात्र चित्रपट आजही कमाई करताना दिसत आहेत. चाहत्यांमध्ये चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळते. आता पठाण हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनाला ५६ दिवस पूर्ण झाल्यावर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राइमने सोशल मीडियावर पठाणमधील एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

‘पठाण’ या चित्रपटातून बॉलिवूड किंग शाहरुख खान याने तब्बल चार वर्षानंतर मनोरंजन विश्वात पुनरागमन केले आहे. त्याचे हा कमबॅक चांगलाच हिट ठरला आहे. आता त्याच्या आगामी ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा हाय अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपट गेल्या महिन्यात २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला दमदार ओपनिंगही मिळाली होती. ‘पठाण’मध्ये शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. दीपिका पदुकोणनेही या चित्रपटात अॅक्शन सीन्स केले आहेत. या चित्रपटामध्ये सलमान खानही कॅमिओ भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाने जगभरात १ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘पठाण’ रिलीजच्या पहिल्या टप्प्यात १००० कोटी कमावणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.

IPL_Entry_Point

विभाग