मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sairat: ‘सैराट’मधील प्रिन्सला कोणत्याही क्षण अटक होण्याची शक्यता; काय आहे प्रकरण?

Sairat: ‘सैराट’मधील प्रिन्सला कोणत्याही क्षण अटक होण्याची शक्यता; काय आहे प्रकरण?

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 16, 2022 10:04 AM IST

Suraj Pawar from Sairat: सैराट चित्रपटात प्रिन्स ही भूमिका अभिनेता सूरज पवारने साकारली आहे. आता तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

सूजर पवार
सूजर पवार (HT)

Suraj Pawar from Sairat: काही चित्रपट असे असतात जे प्रदर्शित होऊन बरीच वर्षे उलटली तरी प्रेक्षक ते आवडीने पाहतात. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे २०१६ साली प्रदर्शित झालेला 'सैराट.' या चित्रपटातील रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांची केमिस्ट्री चाहत्यांच्या भलतीच पसंतीला उतरली होती. तसेच चित्रपटातील आर्चीचा भाऊ प्रिन्स हे देखील गाजले होते. ही भूमिका अभिनेता aa साकारली होती. आता सूरज अडचणीमध्ये सापडला आहे. त्याला कधीही अटक होण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

समोर आलेल्या माहितीनुसार, सूरजने एक धक्कादायक प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. त्याने मंत्रालयात नोकरी देतो हे सांगून शिर्डीमधील एका व्यक्तीची फसवणूक केली आहे. नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन जणांवर अटक करण्यात आली आहे.
वाचा: 'ते ऋषभ पंतसाठी नव्हते', सॉरी वक्तव्यावर उर्वशीचे स्पष्टीकरण

नेमकं काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी नेवासा तालुक्यातील भेंडा येथील महेश बाळकृष्ण वाघडकर यांना मंत्र्यालयातून फोन आल्याचे भासवण्यात आले. त्यांना आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या सहायक कक्षाधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायच्या आहेत. तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील असे फोनवर सांगण्यात आले. काम होण्यापूर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर मिळेल त्यावेळी तीन लाख रुपये द्या असं फोनवरील व्यक्तीने सांगितले.

IPL_Entry_Point

विभाग