मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sahkutumb Sahaparivar: ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; मालिकेत होणार मोठा बदल

Sahkutumb Sahaparivar: ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; मालिकेत होणार मोठा बदल

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 16, 2022 11:55 AM IST

Sahkutumb Sahaparivar: मालिका यशाच्या शिखरावर असतानाच या मालिकेतील मुख्य अभिनेत्याने मालिकेला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे.

Sahkutumb Sahaparivar cast
Sahkutumb Sahaparivar cast

Sahkutumb Sahaparivar: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ सध्या प्रेक्षकांना नात्यांचं महत्त्व पटवून देतेय. चार भावांच्या कुटुंबाची कथा या मालिकेतून दाखवण्यात येत आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मालिका यशाच्या शिखरावर असतानाच या मालिकेतील मुख्य अभिनेत्याने मालिकेला अलविदा म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत ‘वैभव’ हे पात्र साकारणारा अभिनेता अमेय बर्वे याने मालिकेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री नंदिता पाटकर हिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित अमेय बर्वेला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता अमेय बर्वे याने ही मालिका का सोडली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अभिनेत्री नंदिता पाटकर या मालिकेत अमेयच्या मोठ्या वाहिनीची भूमिका साकारत होती. तिने पोस्ट लिहित अमेयला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री नंदिता पाटकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘अम्या.... हक्काने भांडणारा, हट्ट करणारा, मस्का मारणारा, खोड्या काढणारा..... जगातला आगाऊ माणूस आहेस तू. जिकडे जाशील तिकडे माणसं जोडतोस, इतका जीव लावतोस....की, तू जाताना लोकं नुसती रडारड करून हैराण. तुझी स्टाईल, तुझा अ‍ॅटीट्युड, तुझा वावर सगळ्यांना हवाहवासा वाटणारा. तुझा सेन्स ऑफ ह्युमर इतका विचित्र की, तुझ्यावर कितीही राग आला तरी समोरच्याला हसायला भाग पाडणारा.’

‘किती सवय लावलीयस यार तू आम्हा सगळ्यांना. लॉकडाऊन, कोव्हिड, सण, वाढदिवस, ब्रेकअप, गेट टू गेदर, काँट्रोव्हर्सी, टीआरपी, नाईट शिफ्ट..... चांगले आणि वाईट दिवस सगळंच आपण एकत्र साजरं केलं.. आता तुझ्याशिवाय हे सगळं कठीण वाटणार आहे आम्हाला... अमेय तू नेहमीच आमच्या टीमचा एक भाग असणार आहेस. तुझी जागा दुसरं कुणीच घेऊ शकत नाही’, असे नंदिताने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आता अमेयच्या एक्झिटनंतर त्याच्या भूमिकेत दुसरा अभिनेता येणार की, मालिकेच्या कथानकात बदल होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

IPL_Entry_Point