मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Video: शाहरुख खान मंचावर आला अन् थेट अमिताभ बच्चन यांचे पायच धरले! पाहा नेमकं काय झालं...

Video: शाहरुख खान मंचावर आला अन् थेट अमिताभ बच्चन यांचे पायच धरले! पाहा नेमकं काय झालं...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 16, 2022 11:27 AM IST

Shah Rukh Khan, Amitabh Bachchan: अभिनेता शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनी नुकतीच कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती.

Shah Rukh Khan And Amitabh Bachchan
Shah Rukh Khan And Amitabh Bachchan

Shah Rukh Khan, Amitabh Bachchan: बॉलिवूडचा किंग आणि महानायक नुकतेच एका मंचावर एकत्र पाहायला मिळाले. अभिनेता शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनी नुकतीच कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी मंचावर आलेल्या शाहरुख खान याने एक अशी कृती केली की, ज्यामुळे सगळेच चाहते त्याचे कौतुक करत आहे. शाहरुख खान जेव्हा मंचावर आला, तेव्हा त्याने आधीच स्थानापन्न असलेल्या अमिताभ बच्चन यांना वाकून नमस्कार केला. शाहरुख खान याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच KIFF हा प्रतिष्ठीत फिल्म फेस्टिव्हल १५ डिसेंबरपासून सुरु झाला आहे. यावेळी काही मानाच्या पुरस्कारांचे वितरण देखील झाले. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता शाहरुख खान, अमिताभ बच्चन, गायक अरिजित सिंह, अभिनेत्री राणी मुखर्जी, जया बच्चन यांसारखे दिग्गज कलाकार या सोहळ्यात उपस्थित होते. यावेळी शाहरुख खान भर मंचावर बिग बींच्या पाया पडला, हे पाहून सगळेच त्याचे कौतुक करत आहेत.

या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने बॉलिवूडचे दोन दिग्गज कलाकार एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली. तर, शाहरुख खान याने अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांना वाकून नमस्कार केला. मंचावरील हे दृश्य पाहून अनेकांना ‘कभी ख़ुशी कभी गम’ चित्रपटातील एका सीनची आठवण आली. या चित्रपटात अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकला होता. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा तिघांना मंचावर पाहून चाहते देखील आनंदित झाले.

नव्या वर्षात शाहरुख खान याचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ‘पठाण’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. ‘पठाण’ या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान हि जोडी झळकणार आहे. सध्या हा चित्रपट यातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे वादात अडकला आहे. मात्र, या वादावर देखील शाहरुख खान याने सडतोड उत्तर देत ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.

IPL_Entry_Point