मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: पुन्हा सुरू होणार बदल्याचा नवा खेळ! ‘रंग माझा वेगळा’ मालिका रंजक वळणावर

Rang Maza Vegla: पुन्हा सुरू होणार बदल्याचा नवा खेळ! ‘रंग माझा वेगळा’ मालिका रंजक वळणावर

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 11, 2023 03:11 PM IST

Rang Maza Vegla Latest Episode: घाडगे वकील पुन्हा एकदा एक डाव खेळताना दिसणार आहे. दुसरीकडे दीपाला कार्तिकचा डाव समजल्यामुळे आत ती देखील सावध झाली आहे.

Rang Maza Vegla
Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Episode:रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता सध्या बदल्याचा खेळ रंगताना दिसत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र एकमेकांवर सूड उगवायचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे कार्तिक आणि श्वेता मिळून दीपाला त्रास देत आहेत. तर, दुसरीकडे घाडगे वकील एकाचवेळी आयेशाच्या कुटुंबाचा वापर करून आयेशाला आणि इनामदारांना त्रास देत आहे. आता घाडगे वकील पुन्हा एकदा एक डाव खेळताना दिसणार आहे. तर, दुसरीकडे दीपाला कार्तिकचा डाव समजल्यामुळे आत ती देखील सावध झाली आहे.

मालिकेत आता पुन्हा एकदा बदल्याचा नवा खेळ रंगताना दिसणार आहे. आता घाडगे वकील दीपा आणि आयेशाच्या कुटुंबाला थेट एकमेकांशी भिडायला लावणार आहे. आतापर्यंत आयेशाच्या कुटुंबाचा वापर करून घाटगे वकील इनामदार कुटुंबाला त्रास देत होता. मात्र, त्याच्या कटकारस्थानांना वैतागलेला आर्यन आता त्यांच्या कुठल्याही कटात सामील होण्यास नकार देत आहे. तसेच आता त्याला पैसे देखील उकळता येणार नसल्याने घाडगे वकील चांगलाच खवळला आहे. याचा बदला घेण्यासाठी तो आता सगळ्यांनाच अडकवणार आहे.

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ लवकरच गाठणार १०० कोटींचा टप्पा! पाहा सहाव्या दिवसाचे कलेक्शन

यासाठी तो आता आयेशाचा वापर करणार आहे. आयेशाने इंजेक्शन बदलून साक्षीचा जीव घेतला, हे सत्य आता तो दीपासमोर आणणार आहे. आयेशाचं हे सत्य केवळ तिच्या कुटुंबाला आणि घाडगे वकिलाला माहित आहे. कार्तिक आणि दीपा इनामदार यांच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी घाडगे वकिलाने आता आयेशा आणि तिच्या कुटुंबाला हाताशी धरलं आहे. एकाच दगडात दोन पक्षी मारता यावेत असा डाव त्याने आखला आहे. एकीकडे त्याने आयेशाला एका गुन्हातून बाहेर काढून तिच्या कुटुंबाला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आहे.

येत्या भागात घाटगे वकील आयेशाच्या कुटुंबाला धमकी देत दीपाकडे साक्षीच्या खुनाचे पुरावे पाठवणार आहे. आता तो हे केवळ धमकी देण्यासाठी करत आहे की, त्याने खरंच हे पुरावे दीपाला दिले, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point