Kangana Ranaut talks about regrets: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून कंगना आपल्या दमदार अभिनयाने मोठा पडदा गाजवत आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला तिने अनेक छोट्या भूमिका आणि विनोदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र, आता कंगनाने बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवले आहेत. कंगना तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी इतकी प्रसिद्ध आहे की, तिच्यासोबत काम करण्यापूर्वी दिग्दर्शकही अनेक वेळा विचार करतात. त्यामुळे कंगनानेच आता दिग्दर्शनाची सूत्रे हाती घेतली आहेत. मात्र, आता
चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच कंगना रनौतने आता दिग्दर्शनही सुरू केले आहे. दरम्यान, कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक जुना व्हिडीओ शेअर करून यावर प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओद्वारे तिने तिच्या चाहत्यांना हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, ती अधिक चांगल्यासाठी पात्र आहे. पण, तरीही ती कधी विचलित झाली नाही. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये कंगना तिच्या जुन्या चित्रपटांबद्दल बोलताना दिसली आहे.
‘रास्कल’ आणि ‘डबल धमाल’ या तिच्या दोन चित्रपटांचा संदर्भ देत कंगना म्हणाली की, प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी चुकीचा निर्णय घेतो. या व्हिडीओवर कंगना रनौत म्हणाली की, ‘लोक म्हणतात की तू रास्कल, डबल धमालसारखे चित्रपट करायला नको होते. तू आणखी चांगल्या भूमिकांसाठी पात्र आहेस. पण, यावर कंगना म्हणाली की, तेव्हा तिच्याकडे कोणताही पर्याय नव्हता, त्यामुळे तिने कोणतेही काम लहान मानले नाही आणि मिळणारी प्रत्येक भूमिका केली.’
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी अधिक चांगल्या भूमिकांसाठी पात्र आहे, हे माहीत असतानाही कधीही निराश झाले नाही किंवा निंदक झाले नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी कधीही चुकीचा निर्णय घेतला नाही.’ अभिनेत्री कंगना रनौत अनेकदा आपला संताप बेधडकपणे व्यक्त करताना दिसते. मग तो राग बॉलिवूडवर काढणे असो, की राजकारणाबाबत आपली बाजू सर्वांसमोर ठेवणे असो. कंगना नेहमीच बेधडकपणे बोलताना दिसते.
संबंधित बातम्या