मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Citadel Trailer: प्रियांकाच्या स्पाय थ्रिलर वेब सीरिज ‘सिटाडेल’चा ट्रेलर रिलीज; हिंदीतही पाहता येणार

Citadel Trailer: प्रियांकाच्या स्पाय थ्रिलर वेब सीरिज ‘सिटाडेल’चा ट्रेलर रिलीज; हिंदीतही पाहता येणार

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 07, 2023 08:42 AM IST

Citadel Trailer release: अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास हिच्या ‘सिटाडेल’ या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Citadel Trailer
Citadel Trailer

Citadel Trailer release: अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास हिच्या ‘सिटाडेल’ या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘सिटाडेल’ हा एक स्पाय थ्रिलर ड्रामा असून, प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये एकूण सहा भाग असणार आहेत. या वेब सीरिजची निर्मिती रुसो ब्रदर्स आहेत. ‘सिटाडेल’चे पहिले दोन भाग २८ एप्रिल रोजी स्ट्रीम केले जाणार असून, २६ मे पासून दर आठवड्याला एक नवीन भाग प्रदर्शित केला जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘सिटाडेल’ या शोची निर्मिती एजीबीओ आणि रुसो ब्रदर्सचे डेव्हिड वेल यांनी केली आहे. या सीरिजमध्ये प्रियांकासोबत स्टॅनली टुसी, लेस्ली मेनविले आणि रिचर्ड मॅडन हे काळकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. केवळ इंग्रजीच नव्हे, तर ही सीरिज भारतात हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. ‘सिटाडेल’चा ट्रेलर गेल्या आठवड्यात रिलीज होणार होता, पण ग्रीसमधील रेल्वे अपघातामुळे त्याचे रिलीज पुढे ढकलण्यात आले होते. अखेर आता हा ट्रेलर रिलीज झाला आहे.

‘द रिंग्ज ऑफ पॉवर’नंतर ‘सिटाडेल’ ही प्राईमची सर्वात महागडी वेब सीरिज असल्याचे म्हटले जात आहे. ‘सिटाडेल’चे प्रारंभिक बजेट सुमारे १६० दशलक्ष डॉलर होते, अशी माहिती समोर आली होती. परंतु, आता यात आणखी ७५ दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली आहे. प्रियांकाने एक फोटो शेअर करून २०२१ मध्ये सिटाडेलचे शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली होती, ज्यामध्ये तिचा चेहरा धुळीने माखलेला दिसला होता.

प्रियांका चोप्राची ही दुसरी वेब सीरिज आहे. यापूर्वी तिने २०१५ ते २०१८ पर्यंत प्रसारित झालेल्या ‘क्वांटिको’ या शोमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. यात तिने अॅलेक्स पॅरिश नावाच्या एजंटची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी प्रियांकाने तिच्या 'लव्ह अगेन' या हॉलिवूड चित्रपटाचा फर्स्ट लूकही रिलीज केला होता. प्रियांका याआधी 'द मॅट्रिक्स रिसर्क्शन्स'मध्ये झळकली आहे. प्रियांकाचा नेटफ्लिक्सवरील ‘द व्हाईट टायगर’ हा चित्रपट खूप गाजला होता.

IPL_Entry_Point