मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Anupam Kher Birthday: अवघे ३७ रुपये घेऊन मुंबईत आले होते अनुपम खेर; रेल्वे फलाटावर घालवलेली रात्र!

Anupam Kher Birthday: अवघे ३७ रुपये घेऊन मुंबईत आले होते अनुपम खेर; रेल्वे फलाटावर घालवलेली रात्र!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 07, 2023 07:32 AM IST

Anupam Kher Birthday Special: अनुपम खेर यांनी करिअरच्या सुरुवातीला खूप संघर्ष केला आहे. अवघे ३७ रुपये घेऊन अनुपम खेर मुंबईत आले होते.

Anupam Kher
Anupam Kher

Anupam Kher Birthday Special: बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचा आज (७ मार्च) वाढदिवस असून, त्यांनी आज ६९व्या वर्षात पदार्पण केलं आहे. अनुपम खेर यांचा जन्म हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे एका काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. अनुपम खेर यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. १९८४मध्ये महेश भट्ट यांच्या 'सारांश' या चित्रपटातून अनुपम खेर यांनी मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. या चित्रपटात २८ व्या वर्षी अनुपम यांनी एका मध्यमवर्गीय निवृत्त वृद्धाची भूमिका साकारली होती.

ट्रेंडिंग न्यूज

अनुपम खेर यांनी करिअरच्या सुरुवातीला खूप संघर्ष केला आहे. अवघे ३७ रुपये घेऊन अनुपम खेर मुंबईत आले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी रेल्वे स्टेशनवर रात्र काढली होती. अनुपम खेर यांना त्यांच्या लूकमुळे कुणीही काम देत नव्हते. सुरुवातीच्या तीन वर्षांत त्यांना कोणीही काम दिले नव्हते. अशा कठीण वेळी एका क्षणी त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यानंतर ते महेश भट्ट यांना भेटले. महेश भट्ट यांनी त्यांना ‘सारांश’ चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. ‘सरांश’ चित्रपटाने अनुपम खेर यांच्या करिअरला कलाटणी दिली.

कधीकाळी अवघे ३७ रुपये घेऊन मुंबईत आलेले अनुपम खेर आजघडीला कोट्यवधींची कमाई करतात. चित्रपटांव्यतिरिक्त तो जाहिराती आणि टीव्ही शोमधूनही कमाई करतात. अनुपम खेर यांनी १९७९ साली मधुमालतीसोबत लग्न केले होते. हे अनुपम खेर यांचे अरेंज्ड मॅरेज होते. मात्र, त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही. १९८५ मध्ये अनुपम खेर यांनी चंदीगडमधील अभिनेत्री आणि लोकसभा खासदार किरण खेर यांच्याशी लग्न केले.

'सारांश'मधून पदार्पण केल्यापासून अनुपम खेर यांनी ५०० हून अधिक चित्रपट केले आहेत. अभिनय विश्वातील त्यांचे योगदान पाहून भारत सरकारने २००४मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ आणि २००६मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग