मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Priyanka Chopra Daughter: अखेर प्रियांकाने दाखवला लेकीचा चेहरा; कुणासारखी दिसतेय मालती.. पाहा video

Priyanka Chopra Daughter: अखेर प्रियांकाने दाखवला लेकीचा चेहरा; कुणासारखी दिसतेय मालती.. पाहा video

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 31, 2023 08:34 AM IST

Priyanka Chopra Daughter: प्रियांका आणि निक यांची लेक नुकतीच एक वर्षांची झाली आहे. यानंतर पहिल्यांदाच प्रियांकाने मालती मेरीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.

Malti Marie Chopra Jonas
Malti Marie Chopra Jonas

Priyanka Chopra Daughter: बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच प्रसिद्धी झोतात असते. मात्र, यावेळी प्रियांका नाही तर, तिची लेक मालती मेरी चोप्रा जोनास चर्चेत आली आहे. प्रियांका आणि निक यांची लेक नुकतीच एक वर्षांची झाली आहे. यानंतर पहिल्यांदाच प्रियांकाने मालती मेरीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. प्रियांकाने वर्षभर आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला नव्हता. मात्र, आता स्वतः प्रियांकाने एक व्हिडीओ शेअर केला असून, यात मालतीची झलक पाहायला मिळाली आहे.

प्रियांकाने नुकतीच पती आणि गायक निक जोनास व त्याचे भाऊ केविन आणि जो जोनास ब्रदर्स यांच्यासोबत हॉलीवूड वॉक ऑफ फेम सोहळ्याला हजेरी लावली होती. यादरम्यान शेअर केलेल्या एका व्हिडीओत मालतीची झलक दिसली आहे. पांढरा टॉप, क्रीम स्वेटर आणि मॅचिंग शॉर्ट्समध्ये मालती मेरी खूपच क्यूट दिसत होती. प्रियांका चोप्रा तिची मुलगी मालती हिच्या पहिल्या पब्लिक अपिअरन्सबद्दल खूप उत्सुक होती.

प्रियांकाने निकचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये मालतीचा चेहराही दिसत आहे. मालती तिच्या आईच्या म्हणजेच प्रियांकाच्या मांडीवर बसलेली दिसली. प्रियांका देखील बॉडीकॉन ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. या व्हिडीओमध्ये निक आणि त्याचे भाऊ स्टेजवर दिसत आहेत. तर, मालती मेरी प्रियांकाच्या मांडीवर बसली आहे. यात एका बाजूने मालतीचा चेहरा दिसत आहे. प्रियांका लेकीला तिचे बाबा स्टेजवर असल्याचे दाखवते आणि निक स्टेजवरूनच मालती मेरीकडे हात करतो. या क्यूट व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी मालती मेरी ही अगदी आपल्या वडिलांप्रमाणे म्हणजेच निक जोनास सारखी दिसत असल्याचे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच व्होग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका चोप्राने तिने बाल जन्माला घालण्यासाठी सरोगसीची मदत का घेतली, याचा खुलासा केला होता. यानंतर आता तिने सगळ्यांना मालती मेरीचा चेहरा देखील दाखवला आहे.

IPL_Entry_Point