मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan : ‘पठाण’चं रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन; ठरला सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट!

Pathaan : ‘पठाण’चं रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन; ठरला सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 05, 2023 10:17 AM IST

Pathaan Box Office Collection: 'पठाण' चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत, त्यामुळेच 'पठाण' बॉक्स ऑफिसवरही धमाकेदार कलेक्शन करत आहे.

Pathaan
Pathaan

Pathaan Box Office Collection: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ४ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर सुपरस्टार शाहरुख खानचे 'पठाण' चित्रपटातून धमाकेदार पुनरागमन झाले आहे. रिलीज झाल्यापासून दररोज 'पठाण'च्या कलेक्शनमध्ये वाढ होत आहे. रिलीजच्या ११व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या शनिवारी देखील 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'पठाण' चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत, त्यामुळेच 'पठाण' बॉक्स ऑफिसवरही धमाकेदार कलेक्शन करत आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी ५५ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई करणारा 'पठाण' रिलीज होऊन ११ दिवस उलटूनही थांबायचे नाव घेत नाहीये. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'पठाण'ने शनिवारी बॉक्स ऑफिसवर २१ ते २२ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे 'पठाण'चे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ४०० कोटींच्या जवळ पोहोचले आहे. शनिवारी 'पठाण'च्या कलेक्शनमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यासोबतच या दुसऱ्या वीकेंडला 'पठाण' ४०० कोटींहून अधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन सहज करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

११व्या दिवशीच ‘पठाण’ने आमिर खानच्या सुपरहिट चित्रपट ‘दंगल’चा विक्रम मोडला आहे आणि सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. आमिर खानचा ‘दंगल’ २०१६मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने एकूण ३८७.३८ कोटींची कमाई केली आहे. त्याचवेळी ‘पठाण’चे कलेक्शन ११ दिवसांत सुमारे ४०० कोटी रुपये झाले आहे. त्याचवेळी, ‘पठाण’ लवकरच ‘बाहुबली २’ आणि ‘KGF २’चा रेकॉर्ड मोडेल अशी अपेक्षा आहे.

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुखने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. तर, अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस स्टाईलनेही धुमाकूळ घातला आहे. जॉन अब्राहम देखील खलनायकाच्या भूमिकेत हिट ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कॅमिओनेही या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग