मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Oscars 2023 : ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्यावर परफॉर्मन्स देणार नाहीत रामचरण-ज्युनियर एनटीआर!

Oscars 2023 : ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्यावर परफॉर्मन्स देणार नाहीत रामचरण-ज्युनियर एनटीआर!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 11, 2023 12:08 PM IST

Oscars 2023 Update: अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि राम चरण ‘नाटू नाटू’ या गाण्यावर स्टेजवर परफॉर्मन्स करणार अशी चर्चा होती. मात्र, अभिनेत्याने याला नकार दिला आहे.

Jr NTR-Ram Charan
Jr NTR-Ram Charan

Oscars 2023 Update: ऑस्कर २०२३च्या धमाकेदार सोहळ्याला काही तासांनी सुरुवात होणार आहे. मात्र, आता ‘आरआरआर’ या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. याआधी अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि राम चरण ‘नाटू नाटू’ या गाण्यावर स्टेजवर परफॉर्मन्स करणार अशी चर्चा होती. मात्र, आता हे दोघेही या गाण्यावर परफॉर्मन्स देणार नाहीत, हे समोर आले आहे. खुद्द ज्युनियर एनटीआरने एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे.

यंदा ऑस्करचे हे ९५वे वर्ष असणार आहे. या ‘नाटू नाटू’ या गाण्यावर कोण परफॉर्मन्स सादर करणार यावर बोलताना ज्युनियर एनटीआरने सांगितले की, एमएम कीरावानी, राहुल सिपलीगंज आणि काल भैरव या गाण्यावर परफॉर्म करतील. यावेळी केवळ कलाकार नव्हे तर, संपूर्ण देश या सोहळ्यात मानाने सहभागी होणार आहे, असे देखील अभिनेता यावेळी म्हणाला. ‘नाटू नाटू’ या गाण्याला आणि ‘आरआरआर’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

एसएस राजामौली यांनी ‘आरआरआर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, ‘नाटू नाटू’ हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे ऑस्कर २०२३मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या पुरस्कार श्रेणीसाठी नामांकित झाले आहे. अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवणारे ‘नाटू नाटू’ हे पहिलेच भारतीय गाणे आहे. ज्युनियर एनटीआरला जेव्हा या गाण्यावर परफॉर्मन्स करण्याबद्दल विचारण्यात आले.

यावेळी तो म्हणाला की, 'आम्ही पण विचार करत होतो की, असं होईल. पण दुर्दैवाने सरावासाठी वेळ मिळाला नाही. आणि कोणत्याही तयारीशिवाय जगातील सर्वात मोठ्या मंचावर आम्हाला जायचे नाही. सध्या आम्ही खूप व्यस्त होतो. राम चरण देखील त्याच्या इतर कामांमध्ये खूप व्यस्त होता. यामुळे आम्ही परफॉर्म करू असे वाटत नाही. पण, आमचे संगीत दिग्दर्शक नक्कीच परफॉर्म करतील. आणि प्रेक्षक गॅलरीत बसून हे गाणे पाहण्याचा अनुभव खूप छान असेल. लॉस एंजेलिसमध्ये १२ मार्च रोजी ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग