मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Oscar 2023: विल स्मिथच्या 'त्या' कृत्यानंतर ऑस्कर २०२३मध्ये मोठा बदल

Oscar 2023: विल स्मिथच्या 'त्या' कृत्यानंतर ऑस्कर २०२३मध्ये मोठा बदल

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 25, 2023 10:10 AM IST

Oscar 2023: ऑस्कर २०२२ सोहळ्यात अभिनेता विल स्मिथने भर कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर आता ऑस्कर २०२३ पूर्वी अकादमीने मोठा निर्णय घेतला आहे.

ऑस्कर २०२३
ऑस्कर २०२३ (HT)

चित्रपटसृष्टीमध्ये सर्वोच्च मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. २०२२ साली झालेल्या ऑस्कर सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. या पुरस्कार सोहळ्यात विल स्मिथने सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या भर स्टेजवर कानशिलात लगावली होती. त्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. आता यंदाच्या ऑस्कर सोहळ्यासाठी ऑस्कर अकादमीने मोठा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

१२ मार्च २०२३ रोजी ऑस्कर सोहळा पार पडणार आहे. यापूर्वी झालेल्या ऑस्कर सोहळ्यातील गोंधळ पुन्हा होऊ नये म्हणून अकादमीने थेट क्रायसिस कमिटी तयार केली आहे. जेणे करुन गेल्यावर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात झालेल्या घटना पुन्हा होणार नाहीत.
वाचा: मरता मरता वाचला अभिनेता, सेटवरचा अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ

ऑस्कर २०२३ हा पुरस्कार सोहळा १२ मार्चला आयोजित करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा कॉमेडियन जिमी किमेल होस्ट करणार आहे. त्यामुळे सर्वांमध्ये ऑस्कर सोहळ्याची उत्सुकता पाहायला मिळते.

ऑस्कर नामांकनात ‘आरआरआर’ने मिळवली जागा

ऑस्करने ९५व्या अकादमी पुरस्कारांसाठी निवडलेल्या चित्रपटांची नावे जाहीर केली आहेत. यंदा ऑस्करच्या शर्यतीत भारतातील २ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' श्रेणीमध्ये ‘छेल्लो शो’ला नामांकन जाहीर झाले आहे. तर, ‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला ‘मूळ गाणे’ अर्थात ‘ओरिजिनल साँग’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. ‘छेल्लो शो’सोबतच 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' श्रेणीतील इतर चित्रपटांमध्ये 'अर्जेंटिना १९८५', 'द क्वाईट गर्ल', 'द ब्लू काफ्तान' आणि इतर काही चित्रपटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदाच्या ऑस्कर शर्यतीत पाकिस्तानातील चित्रपटाने देखील स्थान मिळवले आहे. पाकिस्तानी चित्रपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानी चित्रपट 'जॉयलँड'ला देखील या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

IPL_Entry_Point

विभाग