मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Satish Kaushik: सतीश कौशिक यांच्या मृत्यूवरून संशयकल्लोळ; होळी पार्टीच्या ठिकाणी सापडली आक्षेपार्ह औषधे!

Satish Kaushik: सतीश कौशिक यांच्या मृत्यूवरून संशयकल्लोळ; होळी पार्टीच्या ठिकाणी सापडली आक्षेपार्ह औषधे!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 11, 2023 10:56 AM IST

Satish Kaushik Death: सतीश कौशिक ज्या ठिकाणी पार्टी करत होते त्या फार्म हाऊसमधून पोलिसांना काही आक्षेपार्ह औषधांची पाकिटे मिळाली आहेत.

Satish Kaushik
Satish Kaushik

Satish Kaushik Death: प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. होळीच्या दिवशी सतीश कौशिश हे दिल्लीतील एका फार्म हाऊसवर पार्टीसाठी गेले होते. याच ठिकाणी त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. याच दरम्यान ९ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. वैद्यकीय तपासात सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. सतीश कौशिक ज्या ठिकाणी पार्टी करत होते त्या फार्म हाऊसमधून पोलिसांना काही आक्षेपार्ह औषधांची पाकिटे मिळाली आहेत. या औषधांचा सतीश कौशिक यांच्या मृत्यूशी संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

सतीश कौशिक यांच्या मृत्यूबाबत सुरू असेलल्या तपासाबद्दल माहिती देताना दिल्ली पोलिसांनी म्हटले की, अद्याप संपूर्ण पोस्टमॉर्टम अहवालाची प्रतीक्षा आहे. मृत्यूचे नेमके कारण काय होते हे त्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांच्या गुन्हे पथकाने दिल्लीच्या दक्षिण पश्चिम भागात असलेल्या या फार्म हाऊसची झडती घेतली. याच फार्म हाऊसवर होळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. घटनास्थळावरून गुन्हे पथकाला काही औषधे मिळाली आहेत. आता या औषधांचा वापर कोणी केला याचा तपास सुरू आहे. सतीश कौशिक यांचा त्याच्याशी संबंध नाही. या सर्वाचा तपास सुरू आहे.

दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या फार्म हाऊसवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. पोलीस आता पार्टीत सहभागी झालेल्या सगळ्या पाहुण्यांची यादी तयार करत आहेत. दुसरीकडे, पार्टीत सहभागी असलेल्या व्यावसायिकाचा या प्रकरणातील वाँटेड यादीत समावेश आहे. याच होळी पार्टीत सहभागी होण्यासाठी अभिनेते सतीश कौशिष मुंबईहून दिल्लीला आले होते. विकास मालू या मित्राच्या फार्म हाऊसवर सतीश कौशिक पार्टीत सहभागी होण्यासाठी आले होते. त्याचे हे फार्म हाऊस दिल्लीतील बिजवासन येथे आहे. विकास मालूवर एक वर्षाआधी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्याचा पोलीस अजूनही तपास करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग