मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed: तिला आता मुंबईत राहूच देणार नाही; सोशल मीडिया स्टारने उर्फीला पाठवली कायदेशीर नोटीस!

Urfi Javed: तिला आता मुंबईत राहूच देणार नाही; सोशल मीडिया स्टारने उर्फीला पाठवली कायदेशीर नोटीस!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 11, 2023 10:25 AM IST

Legal Notice To Urfi Javed : उर्फी जावेद आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर फैजान अन्सारी यांच्यात कपड्यांवरून सुरू झालेले भांडण आता कोर्टात पोहोचले आहे.

Faizan-Urfi
Faizan-Urfi

Legal Notice To Urfi Javed : मॉडेल-अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फी जावेद आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर फैजान अन्सारी यांच्यात कपड्यांवरून सुरू झालेले भांडण आता कोर्टात पोहोचले आहे. फैजान अन्सारी याने उर्फी जावेदवर बोल्ड कपडे परिधान करून वातावरण बिघडवल्याचा आणि विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत तिला कायदेशीर नोटीस बजावली आहे. उर्फी जावेदला मुंबईत राहायचे असेल, तर तिला काही मर्यादा पाळाव्या लागतील. अन्यथा आम्ही तिला इथे राहू देणार नाही, असे फैजान अन्सारी यांनी म्हटले आहे.

फैजान अन्सारीने काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदला धमकी देखील दिली होती की, त्यांनी अभिनेत्रीच्या विरोधात मौलानांकडे तक्रार करत, त्यांना तिच्या विरोधात फतवा काढण्यास सांगितले आहे. तसेच, अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिला कबरीस्तानमध्ये दफन करण्यासाठी जागा दिली जाणार नाही, असेही त्याने म्हटले होते. फैजान अन्सारीच्या म्हणण्यानुसार, उर्फी जावेदने तिच्या कपड्यांमुळे धर्माची बदनामी केली आहे आणि यामुळे संपूर्ण समुदायाची मान शरमेने झुकली आहे.

आता फैजान अन्सारीने उर्फी जावेदला हायकोर्टाची नोटीस पाठवली आहे. फैजान अन्सारीने शुक्रवारी आपल्या वकिलासमवेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गरज पडल्यास मुंबई उच्च न्यायालयातही जाणार असल्याचे सांगितले आहे. फैजानने म्हटले की, उर्फी जावेदसोबत माझी लढाई बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. मी अनेक मशिदी आणि कबरीस्तान पत्रे दिली आहेत. मी दिल्ली आणि मुंबईतही पत्रे दिली आहेत. उर्फीविरोधात आता कायदेशीर कारवाई होणार आहे. मी तिला कोर्टात खेचणार आहे.

उर्फीविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. ती खूप वाईट काम करत आहे. अंगप्रदर्शन करून ती पैसे कमवत आहे. प्रसिद्धीसाठी ती हे सर्व करत आहे. त्यामुळे आपल्या टॅलेंट आणि मेहनतीने पुढे आलेल्या बॉलिवूड अभिनेत्री आणि सुपरस्टार्सवरही बोट ठेवले जात आहे, असे फैजान अन्सारीने म्हटले आहे.

WhatsApp channel

विभाग