मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mukta Barve: नाट्यगृहांची वाईट अवस्था दाखवणाऱ्या कलाकारांनंतर आता मुक्ता बर्वेचा व्हिडीओ होतोय व्हायरल! म्हणाली...

Mukta Barve: नाट्यगृहांची वाईट अवस्था दाखवणाऱ्या कलाकारांनंतर आता मुक्ता बर्वेचा व्हिडीओ होतोय व्हायरल! म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 22, 2023 08:45 AM IST

Mukta Barve Viral Video: आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नाटक, चित्रपट असो वा मालिका ती सगळ्याच अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Mukta Barve
Mukta Barve

Mukta Barve Viral Video: सध्या सोशल मीडियावर कलाकार नाट्यगृहांची वाईट अवस्था दाखवताना दिसत आहेत. मोडक्या खुर्च्या, बंद पडलेले एसी, प्रचंड उकाड्यात होणारे प्रेक्षकांचे आणि कलाकारांचे हाल या सगळ्याच गोष्टींवर आता कलाकार व्यक्त होतान दिसत आहेत. नुकताच अभिनेते भरत जाधव यांनी रत्नागिरीत नाटकाचा शो न करण्याचा निर्णय घेतला. याचं कारण देखील नाट्यगृहाची वाईट अवस्था हेच होतं. मात्र, या सगळ्यादरम्यान आता अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने शेअर केलेला एक व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये मुक्ता नाट्यगृहाची प्रशंसा करताना दिसतेय.

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. नाटक, चित्रपट असो वा मालिका ती सगळ्याच अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुक्ता वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृह दाखवताना दिसत आहे. या नाट्यगृहाची चोख व्यवस्था, नाट्यगृह प्रशासन घेत असलेली काळजी, स्वच्छता या सगळ्या गोष्टी तिने आपल्या व्हिडीओमधून दाखवल्या आहेत. ‘चारचौघी’ या नाटकाच्या प्रयोगासाठी मुक्ता विष्णुदास भावे नाट्यगृहात होती. या दरम्यान तिने हा व्हिडीओ बनवला आहे.

Drishyam: कोरियन्सनाही बॉलिवूडची भुरळ! कान्समध्ये झाली ‘दृश्यम’ चित्रपटाच्या कोरियन रिमेकची घोषणा!

विष्णुदास भावे नाट्यगृहात असलेली चोख व्यवस्था दाखवतानाच मुक्ताने इतर नाट्यगृहांमध्ये असलेली दुरवस्था यावर देखील भाष्य केलं आहे. नाटकाच्या टीमने यावेळी आपल्याला इतर नाट्यगृहात येणाऱ्या समस्या सांगितल्या. तर, या नाट्यगृहात कशाप्रकारे व्यवस्थित वातावरण आहे आणि अगदी उत्तमप्रकारे इथे काम करता येत यावर देखील या टीमने भाष्य केलं आहे. तर, पुण्यात नाट्यगृहांमध्ये डास चावू नये म्हणून अक्षरशः अगरबत्ती लावून बसायला लागतं, अशी आपबिती त्यांनी व्यक्त केली.

मुक्ताच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘चांगल्या सरकारी प्रशासकीय व्यवस्थेचे कौतुक करणे ही चांगली गोष्ट आहे. बालगंधर्व रंगमंदिरच नाही, पण मनपाची इतर थिएटर पण थोड्याफार फरकाने दुरावस्था या कॅटेगरीतील आहेत. याची पुणेकर म्हणून नक्कीच मला खंत आहे. योगायोगाने आपल्या नाटकातील बहुतेक कलाकार पुणे मनपाचे करदाते आहेत. पुणे मनपाच्या रंगमंदिराच्या व्यवस्थापनामध्ये नक्की काय फरक आहे हेही आपण तिथल्या कर्मचाऱ्यांकडून माहिती करुन घ्यावे आणि तेही लोकांना माहिती करुन द्यावे, असं मला वाटतं. मी एक पुणेकर आणि मनपा निवृत्त अधिकारी म्हणून या प्रश्नाचा मागोवा घेत आहे. आपणही जमेल तसं लक्ष घालावे अशी विनंती आहे. आपला हा व्हिडीओ जाहीर करण्यामागची सामाजिक भावनेची पुणे मनपा प्रशासन दखल घेईल असा मला विश्वास आहे’, असे एका चाहत्याने म्हटले आहे.

IPL_Entry_Point

विभाग