मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  OTT Release: या आठवड्यात ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी; पाहा कोणकोणते चित्रपट होणार रिलीज...

OTT Release: या आठवड्यात ओटीटीवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी; पाहा कोणकोणते चित्रपट होणार रिलीज...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 18, 2023 09:19 AM IST

OTT Release this week: जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर कोणताही चित्रपट रिलीज होणार नाहीये. मात्र, ओटीटीवर अनेक चित्रपट रिलीज होणार आहेत.

OTT Release
OTT Release

OTT Release this week: नव्या वर्षाच्या सुरुवातीला प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे. या वर्षाची सुरुवातच अनेक धमाकेदार चित्रपटांनी झाली आहे. आणखी अनेक दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र, या आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी ओटीटीवर असणार आहे. जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर कोणताही चित्रपट रिलीज होणार नाहीये. मात्र, ओटीटीवर अनेक चित्रपट रिलीज होणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

ओटीटीवर देखील या आठवड्यात दोन मोठ्या चित्रपटांची टक्कर होणार आहे. यातील एक चित्रपट आहे सिद्धार्थ मल्होत्राचा ‘मिशन मजनू’, तर दुसरा रकुलप्रीतचा ‘छत्रीवाली’ आहे. याशिवाय काही मनोरंजक वेब सीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. चला जाणून घेऊया..

हंट फॉर द इंडियन मुजाहिदीन

‘हंट फॉर द इंडियन मुजाहिदीन’ १९ जानेवारीपासून डिस्ने प्लसवर स्ट्रीम केला जात आहे. शतकाच्या सुरुवातीला झालेला इंडियन मुजाहिदीनच्या उदयाचा आणि पतनाचा मागोवा त्यात आहे. याची कहाणी तपास अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दाखवली जाणार आहे.

मिशन मजनू

‘मिशन मजनू’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. ‘मिशन मजनू’ हा एक स्पाय अॅक्शन चित्रपट आहे, ज्याची कथा सत्तरच्या दशकातील आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा रॉ एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे, जो एका मिशनसाठी पाकिस्तानमध्ये जातो. सिद्धार्थ मल्होत्रासोबत रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनू बागची यांनी केले आहे.

छत्रीवाली

या आठवड्यात ‘छत्रीवाली’ हा चित्रपट झी५वर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रकुल या चित्रपटात कंडोम टेस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सामाजिक समस्यांवर भाष्य करणार आहे.

सिनेमा मरते दम तक

यासोबतच प्राईम व्हिडीओवर ‘सिनेमा मरते दम तक’ नावाची एक मनोरंजक माहितीपट मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेत भारतीय चित्रपटसृष्टीत नव्वदच्या दशकात बनवलेल्या आयकॉनिक चित्रपटांचा आढावा घेण्यात आला आहे. या माहितीपटाची निर्मिती वासन बाला यांनी केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग