मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Boyz 4 Collection: ‘बॉईज ४’चा बॉक्स ऑफिसवर धिंगाणा, रिलिजच्या १०व्या दिवशीही बक्कळ कमाई

Boyz 4 Collection: ‘बॉईज ४’चा बॉक्स ऑफिसवर धिंगाणा, रिलिजच्या १०व्या दिवशीही बक्कळ कमाई

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 31, 2023 07:12 PM IST

Boyz 4 box office collection Day 10: 'बॉईज ४' हा चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस उलटून गेले आहेत. तरी देखील चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.

Boyz 4
Boyz 4

मराठी चित्रपटांच्या इतिहासातील सुपरहिट ब्लॉकबस्टर 'बॉईज'च्या सिरीजने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले आहे. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. 'बॉईज ३'च्या भरघोस यशानंतर आता 'बॉईज ४' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'बॉईज ४' या चित्रपटातील अभिनेता पार्थ भालेकरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या कमाईविषयी माहिती दिली आहे. पार्थने बॉईज ४चे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर चित्रपटाने १० दिवसात जवळपास ४ कोटी २० लाख रुपयांची कमाई केली आहे. हे पोस्टर शेअर करत पार्थने 'बॉईज येणार तर बॉक्स ऑफिसवर पण राडा होणार! सुपरहिट बॉईज ४ची धमाकेदार कमाई' असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: लव्हस्टोरी ते पीरियड ड्रामा, करवा चौथच्या दिवशी हे रोमँटिक सिनेमे नक्की पाहा

'बॉईज ४' चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया हे निर्माते आहेत तर ऋषिकेश कोळी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. वैशिष्टय म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील हा एकमेव चित्रपट आहे, ज्याचे चार भाग आले आहेत. या चित्रपटात सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड, अभिनय बेर्डे, निखिल बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे, गिरीश कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांची प्रमुख भूमिका आहेत.

IPL_Entry_Point

विभाग