मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Manasi Naik: होय, मी घटस्फोटासाठी अर्ज केलाय! अखेर मानसी नाईकनं सांगितलं लग्न मोडण्याचं कारण

Manasi Naik: होय, मी घटस्फोटासाठी अर्ज केलाय! अखेर मानसी नाईकनं सांगितलं लग्न मोडण्याचं कारण

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 22, 2022 05:17 PM IST

Manasi Naik filed divorce:‘हो मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय’,अशी कबुली मानसी नाईक हिने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना दिली आहे.

manasi pradeep
manasi pradeep

Manasi Naik filed divorce: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मानसी नाईक हिच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मानसी नाईक हिने सोशल मीडियावर प्रदीप खरेरा याला अनफॉलो केल्यापासून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता मानसीने यावर मौन सोडले आहे. ‘हो मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलाय’, अशी कबुली तिने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना दिली आहे. अखेर आपण घटस्फोट घेतोय यावर स्वतः मानसी नाईकने शिक्कामोर्तब केला आहे. या निर्णयामागचं कारण देखील तिने सांगितलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

प्रदीपशी घटस्फोट घेण्याविषयी बोलताना मानसी म्हणाली की, ‘घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या या चर्चा दुर्दैवाने खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पुढील प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. या क्षणाला मी खूपच दुःखी आहे.’

याबद्दल सांगताना मानसी म्हणाली, ‘नेमकं काय झालं हे खरंच आता सांगता येणं शक्य नाही. आमच्यात काही गोष्टी सुरळीत होऊच शकल्या नाहीत. सगळं काही खूपच जलद गतीने घडलं. परंतु, आजही माझा प्रेमावर विश्वास आहे. मला पुन्हा प्रेम करायचं आहे. माझ्या आयुष्यात एक वेळ अशी होती, जेव्हा मला स्वतःच कुटुंब हवं होतं आणि म्हणूनच मी लग्न केलं. हे सगळं खूपच घाईघाईत झालं. मला वाटतं ही घाईच माझ्यासाठी बाधक ठरली. या नात्यातून वेगळं होण्याची वेळ आता आली आहे. त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे. पण एक स्त्री म्हणून माझा स्वाभिमान महत्त्वाचा आहे. एखादी व्यक्ती एवढ्या खालच्या थराला जाऊ शकते हे समजून घेणं माझ्यासाठी आवश्यक होतं.’

आता मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचं आहे, असं मानसी म्हणाली. ‘ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, त्याला आपण नेहमीच साथ देतो. पण सगळं एकाच व्यक्तीने करायचं आणि दुसऱ्या व्यक्तीला काहीच वाटत नसेल, तर अशा नात्यातून बाहेर पडणं नेहमीच चांगलं. जर नवरा-बायकोच्या नात्यात समजूतदारपणा नसेल, तर ती डोक्याची घंटा आहे. वेळीच त्यातून बाहेर पडायला हवं’, असं देखील मानसी नाईक म्हणाली.

IPL_Entry_Point