मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mahaparinirvan din: बौद्ध धर्माचा स्वीकार ते नेपाळ भेट; बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना दाखवणारा माहितीपट पाहिलात?

Mahaparinirvan din: बौद्ध धर्माचा स्वीकार ते नेपाळ भेट; बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना दाखवणारा माहितीपट पाहिलात?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 06, 2022 12:31 PM IST

Mahaparinirvan din: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्या याच प्रवासाठी काही महत्त्वपूर्ण घटनांचा समावेश ‘महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटात करण्यात आला आहे.

Dr Babasaheb Ambedkar
Dr Babasaheb Ambedkar

Mahaparinirvan din: आज (६ डिसेंबर) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘भारतीय संविधाना’चे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेकर यांनी अगदी बालपणापासूनच समाजातील जातीभेद पाहिला होता. दलित समाजाला मिळणारी वागणूक त्यांनी जवळून अनुभवली होती. पुढे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजातील अशा लोकांच्या अधिकारांसाठी मोठा संघर्ष केला. त्यांच्या या संघर्षमय प्रवासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या, ज्यांची नोंद इतिहासात झाली. अशाच काही घटनांचं वास्तव चित्रण दाखवणाऱ्या माहितीपटाचे प्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. त्यांच्या याच प्रवासाठी काही महत्त्वपूर्ण घटनांचा समावेश ‘महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटात करण्यात आला आहे. या माहितीपटातील काही दृश काल्पनिक असली, तरी काही मात्र खरी आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित १७ मिनिटांच्या या माहितीपटाची निर्मिती १९६८मध्ये करण्यात आली आहे.

या माहितीपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार याचे दृश्य तसेच, त्यांच्या अंत्ययात्रेतील वास्तविक दृश्य या माहितीपटात पाहायला मिळत आहे. या ब्लॅक अँड व्हाईट माहितीपटात अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांचा समवेश करण्यात आला आहे. मुंबईतील दादर चौपाटीवरील चैत्यभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याच्या अंत्ययात्रेत लाखोंनी जनसमुदाय उसळला होता. त्याच्या अंतयात्रेतील काही दृश्य या माहितीपटात दाखवण्यात आली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या माहितीपटाचे छायांकन मधुकर खामकर यांनी केले आहे. जी.जी. पाटील यांनी चित्रपटाचे संकलन केले आहे. ऐतिहासिक दस्ताऐवजांचा समावेश असणारा हा माहितीपट नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे. तर, दत्ता डावजेकर यांनी या माहितीपटाला संगीत दिले आहे. ज्येष्ठ अभिनेते डेव्हिड अब्राहम हे या चित्रपटाचे निवेदक होते. आजच्या दिवशी हा माहितीपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग