मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tarri: ललित प्रभाकरचा टेरर स्वॅग अन् अ‍ॅक्शनचा धमाका; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘टर्री’

Tarri: ललित प्रभाकरचा टेरर स्वॅग अन् अ‍ॅक्शनचा धमाका; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘टर्री’

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 14, 2023 05:47 PM IST

Tarri Marathi Movie: काहीस बेदरकार आयुष्य जगत, आपल्या स्टाईलचा ‘टेरर स्वॅग’ घेऊन अभिनेता ललित प्रभाकर ‘टर्री' च्या भूमिकेतून आपल्यासमोर यायला सज्ज झाला आहे.

Tarri Marathi Movie
Tarri Marathi Movie

Tarri Marathi Movie: नेहमीच रोमँटिक भूमिकेत दिसणारा अभिनेता ललित प्रभाकर आता लवकरच एका अॅक्शन भूमिकेत दिसणार आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘टर्री’ प्रचंड चर्चेत आला आहे. तरुणाईचा जोश जितका कृतीशील तितकाच तो विध्वंसक असू शकतो. आपल्या उमेदीच्या काळात भविष्यकाळ सोबतीला घेऊन आपल्या कौशल्यांना पैलू पाडण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करणारया तरुणाईचे चित्र आपण सर्वत्र पाहतोय. काहीसं बेदरकार आयुष्य जगत, आपल्या स्टाईलचा ‘टेरर स्वॅग’ घेऊन अभिनेता ललित प्रभाकर ‘टर्री' च्या भूमिकेतून आपल्यासमोर यायला सज्ज झाला आहे. येत्या १७ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काहीच दिवसांपूर्वी ललितने त्याच्या या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं, या पोस्टरमध्ये ललिताचा भन्नाट लूक पाहायला मिळाला होता. ‘त्याची नजर टर्री, त्याचा जिगर टर्री..! त्याला नडणाऱ्यांची टर्रर्रर्रकन फाडायला येतोय...टर्री!!!’ असं कॅप्शन देत ललित प्रभाकर याने हा लूक त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. या पोस्टरला आणि चित्रपटाच्या टीझरला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

‘खेळ कोणता पण असो, सुरु करणारा तोच आणि खल्लास करणारा बी तोच’ अशा जिगरबाज अंदाजातील ‘टर्री' आपल्या मैत्रीसाठी आणि प्रेमासाठी कशाप्रकारे उभा ठाकतो, हे ‘टर्री' चित्रपटामध्ये पहायला मिळणार आहे. एका वेगळ्या अंदाजात ललित प्रभाकरने साकारलेल्या संग्रामच्या ‘टर्री’गिरीला तितकीच दमदार साथ देत, नात्यासाठी खमकेपणाने उभी राहणारी सोनल म्हणजेच अभिनेत्री गौरी नलावडे यांच्या प्रेमाचा अनोखा रंग हा चित्रपट दाखवून देतो.

'टर्री’ हा शब्द पाळणारा, मैत्री जपणारा, कोणतीही जबाबदारी स्वीकारणारा आहे. गरम डोक्याच्या 'टर्री’ मध्ये हळवेपणा आहे. हा हळवेपणा अधोरेखित करताना संग्राम आपल्या आयुष्याकडे, आजूबाजूच्या परिस्थितीकडे कोणत्या नजरेने पाहतो, हे त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. खटकेबाज संवाद, जबरदस्त अॅक्शन याचा मसाला असलेल्या 'टर्री' चित्रपटात ललित सोबत गौरी नलावडे दिसणार असून शशांक शेंडे, अनिल नगरकर, योगेश डिंबळे, स्नेहा जोशी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

IPL_Entry_Point