मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Korean Drama : थ्रिलर, सस्पेन्स अन् रोमान्स; मार्च महिन्यात रिलीज होणार ‘या’ बहुप्रतीक्षित कोरियन सीरिज!

Korean Drama : थ्रिलर, सस्पेन्स अन् रोमान्स; मार्च महिन्यात रिलीज होणार ‘या’ बहुप्रतीक्षित कोरियन सीरिज!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 01, 2023 12:11 PM IST

Korean Drama Series releasing in March 2023: मार्च महिन्यात काही नव्या वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. के ड्रामा चाहते देखील या वेब सीरिजची बऱ्याच काळापासून वाट बघत आहेत.

Korean Drama Series releasing in March 2023
Korean Drama Series releasing in March 2023

Korean Drama Series releasing in March 2023: सध्या के ड्रामा चाहत्यांची वाढती संख्या पाहता सगळ्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोरियन सीरिज दाखवल्या जात आहेत. तर, दर महिन्याला काही नवीन सीरिज या यादीत सामील होत आहेत. मार्च महिन्यात देखील काही नव्या वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. के ड्रामा चाहते देखील या वेब सीरिजची बऱ्याच काळापासून वाट बघत आहेत. चला तर, जाणून घेऊया कोणत्या वेब सीरिज मार्चमध्ये रिलीज होणार आहेत...

ट्रेंडिंग न्यूज

डिलिव्हरी मॅन

‘डिलिव्हरी मॅन’ या वेब सीरिजची कथा सो याँग-मीन नावाच्या एका टॅक्सी ड्रायव्हरभोवती फिरते. आता हा टॅक्सी ड्रायव्हर साधासुधा नसून, त्याच्या गाडीत बसणारे लोक हे भूत आहेत. सो याँगच्या टॅक्सी सर्विसमधून मृत आत्म्यांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण केल्या जातात. मात्र, एका दिवशी त्याच्या गाडीत एका अशा महिलेचे भूत बसते, जी तिची सगळी स्मरणशक्ती हरवून बसली आहे. तिला तिची शेवटची इच्छा देखील आठवत नाहीये. आता हा टॅक्सी ड्रायव्हर तिची इच्छा पूर्ण करू शकेल का? हे या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे.

जोसॉन लॉयर

जोसॉन लॉयर या सीरिजची कथा एक पिरियॉडीक ड्रामा आहे. ही कथा कांग हान सु नावाच्या एका अशा वकिलाबद्दल आहे, जो आपल्या पालकांच्या मृत्यूचा बदला घेऊ इच्छितो. या प्रवासात तो अनेक चांगले मित्र बनवतो. या प्रवासातएक राजकुमारी आणि वकील त्याच्या खास मैत्रिणी बनतात. मात्र, त्याला फक्त स्वत:साठी काम करायचे आहे.परंतु, अजाणतेपणे तो लोकांची मदत करायला लागतो आणि आपल्या मनातील राग विसरून जातो.

द ग्लोरी पार्ट २

‘द ग्लोरी’ ही नेटफ्लिक्सवरची लोकप्रिय वेब सीरिज असून,मून डोंग-युनची कथा यात दाखवण्यात आली आहे. मून डोंग-युन ही हायस्कूलमध्ये तिला छळणाऱ्या गुंडांचा चांगलाच बदला घेते. पहिल्या भागाच्या शेवटी,तिला त्रास देणारी एक टोळी येओन-जिन आणि तिचा नवरा डो-यॉन्ग यांच्यात करार झालेला दाखवण्यात आलेला होता. आता या सीरिजच्या दुसऱ्या भागात आणखी ड्रामा आणि थ्रील पाहायला मिळणार आहे.

ड्यूटी आफ्टर स्कूल

‘ड्यूटी आफ्टर स्कूल’ ही सीरिज एलियन आक्रमणाबद्दल आहे. या एलियन आक्रमणामुळे देशात मोठा रक्तपात होतो. अशावेळी कोरियन सरकार एक आदेश काढते. या आदेशानुसार हायस्कूलचे विद्यार्थी यावर्षी विद्यापीठ प्रवेश परीक्षा देणार नाहीत. तर, त्याऐवजी एलियनशी लढण्यासाठी सैन्यात भरती होतील. ही साय-फाय थ्रिलर सीरिज ‘ऑल ऑफ अस आर डेड’ सारखीच आहे.

ओएसिस

१९८०-९०च्या दशकातील प्रेम,मैत्री आणि स्वप्नांवर आधारित ही कथा आहे. या सीरिजची कथा अशा तीन लोकांच्या जीवनाभोवती फिरते. यात कथेत दोन मुले आणि एक मुलगी आहे, ज्यांचे एकमेकांशी जवळचे नाते निर्माण होते. मात्र, त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यांची कथा प्रेक्षकांना कधी हसवते, तर कधी त्यांच्या डोळ्यांत पाणी आणते.

IPL_Entry_Point

विभाग