मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Khupte Tithe Gupte: ठरलं! 'या' दिवशी प्रदर्शित होणार खुप्ते तिथे गुप्ते', नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

Khupte Tithe Gupte: ठरलं! 'या' दिवशी प्रदर्शित होणार खुप्ते तिथे गुप्ते', नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला

Aarti Vilas Borade HT Marathi
May 05, 2023 02:49 PM IST

Khupte Tithe Gupte: जवळपास १० वर्षानंतर ‘खुपते तिथे गुप्ते’ हा जबरदस्त व अफलातून कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Khupte Tithe Gupte season 2
Khupte Tithe Gupte season 2

छोटया पडद्यावर सध्या अनेक नव्या मालिका आणि नवे शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यात आता लोकप्रिय चॅट शो ‘खुपते तिथे गुप्ते’ जवळपास १० वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. आता मालिका कधी प्रदर्शित होणार हे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नुकताच झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'खुप्ते तिथे गुप्ते' मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करत, 'तुम्हाला काय वाटतं..या खुर्चीवर कोण कोण बसणार? 'खुपते तिथे गुप्ते' ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता' असे कॅप्शन देण्यात आले आहे.
वाचा: मराठीच नव्हे, तर हॉलिवूड चित्रपटही गाजवणारे अभिनेते अजिंक्य देव! वाचा अभिनेत्याबद्दल...

बऱ्याच काळानंतर म्हणजेच जवळपास १० वर्षानंतर ‘खुपते तिथे गुप्ते’ हा जबरदस्त व अफलातून कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’मधून पुन्हा एकदा सगळ्यांची गुपित उलगडणार आहे.नावावरून तर प्रेक्षकांच्या लक्षात आलंच असेल की, ती खुपणारी गोष्ट बेमालूमपणे व खुबीने समोर आणणार आहे, ते आपल्या सर्वांचे अत्यंत लाडके अवधूत गुप्ते.

‘खुपते तिथे गुप्ते’चं हे पर्व सर्वार्थाने वेगळं असणार आहे कारण, या पर्वाच खास आकर्षण असणार आहे ती म्हणजे एक खास‘खुर्ची’. अशीखुर्ची जिच्यासाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळतेय.मग, ते नोकरीमध्ये असो,कॉर्पोरेट जग असो किंवा मग राजकारण. पण, या शोची ही खुर्ची सर्वार्थानं वेगळी असणार आहे. कारण, या खुर्चीवर जे सेलिब्रिटी, राजकारणी किंवा मान्यवर बसणार आहेत, त्यांना अवधूत गुप्ते असे काही प्रश्न विचारणार आहेत जे त्यांना खुपणार नाही, तर टोचणार आहेत. या आधी देखील ‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय टीव्ही शोने खूप प्रसिद्धी मिळवली होती.

IPL_Entry_Point

विभाग