मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ajinkya Deo Birthday: मराठीच नव्हे, तर हॉलिवूड चित्रपटही गाजवणारे अभिनेते अजिंक्य देव! वाचा अभिनेत्याबद्दल...

Ajinkya Deo Birthday: मराठीच नव्हे, तर हॉलिवूड चित्रपटही गाजवणारे अभिनेते अजिंक्य देव! वाचा अभिनेत्याबद्दल...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 03, 2023 08:16 AM IST

Ajinkya Deo Birthday Special: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते अजिंक्य देव यांचा आज ६०वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Ajinkya Deo
Ajinkya Deo

Ajinkya Deo Birthday Special: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते अजिंक्य देव यांचा आज ६०वा वाढदिवस साजरा करत आहेत. अजिंक्य देव यांचा जन्म ३ मे १९६३ रोजी मुंबईत झाला. अभिनयाचा वारसा अजिंक्य देव यांना त्यांच्या कुटुंबाकडूनच मिळाला होता. अभिनेते अजिंक्य देव हे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांचे चिरंजीव आहेत. वयाच्या २२ व्या वर्षी अजिंक्य देव यांनी 'अर्धांगी' या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. केवळ मराठी चित्रपटाच नव्हे, तर त्यांनी आपल्या अभिनयाने हॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.

अतिशय हुशार, हरहुन्नरी असे कलाकार आणि दिमाखदार व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते अजिंक्य देव. त्यांच्या आवाजातील जडपणा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खास पैलू होता. मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून अजिंक्य देव यांची ओळख आहे. केवळ अभिनयच नव्हे, तर त्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाची देखील प्रेक्षकांना भुरळ पडली.

Aruna Irani Birthday: ‘या’ कारणामुळे अरुणा इराणींनी घेतला होता कधीही ‘आई’ न होण्याचा निर्णय! वाचा अभिनेत्रीबद्दल...

अजिंक्य देव यांच्या १९८७मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सर्जा' या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याच वर्षी त्यांनी 'संसार' या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले. ‘संसार’ या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या दीराची भूमिका साकारली होती. यानंतर १९९६मध्ये अजिंक्य देव यांनी ‘द पीकॉक स्प्रिंग’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१९मध्ये आलेल्या ‘द वॉरीयर क्वीन ऑफ झांसी’ या हॉलिवूड चित्रपटात अजिंक्य देव यांनी तात्या टोपेंची भूमिका साकारली होती.

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेल्या अजय देवगण याच्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटातील अजिंक्य देव यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. अजिंक्य देव यांनी मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. अजिंक्य देव यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटातून, मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

IPL_Entry_Point

विभाग