मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  I Prem U Trailer: नावाप्रमाणेच हटके असणार कथानक; 'आय प्रेम यु' चित्रपटाचा कलरफुल ट्रेलर लाँच!

I Prem U Trailer: नावाप्रमाणेच हटके असणार कथानक; 'आय प्रेम यु' चित्रपटाचा कलरफुल ट्रेलर लाँच!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 07, 2023 09:09 AM IST

I Prem U Trailer released: एकतर्फी प्रेमाला मिळणारी वागणूक, त्यातून होणारे मनोव्यापार या ट्रेलरमधून पाहायला मिळतात. कलरफुल आणि म्युझिकल अशी ही प्रेमकथा ट्रेलरमधूनच लक्ष वेधून घेत आहे.

I Prem U Trailer
I Prem U Trailer

I Prem U Trailer released: एका मुलीविषयी वाटणाऱ्या आपुलकीचं प्रेमात होणारं रुपांतर आणि त्यानंतर घडणाऱ्या घडामोडींचं कलरफुल चित्रण असलेल्या आय प्रेम यु या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. प्रेम याच संकल्पनेचा आणखी एक वेगळा पैलू 'आय प्रेम यु' या चित्रपटातून पहायला मिळणार असून हा चित्रपट १७ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

एकतर्फी प्रेमाला मिळणारी वागणूक, त्यातून होणारे मनोव्यापार या ट्रेलरमधून पाहायला मिळतात. कलरफुल आणि म्युझिकल अशी ही प्रेमकथा ट्रेलरमधूनच लक्ष वेधून घेत आहे. प्रेम म्हणजे न सुटणारं समीकरण असं गणितज्ज्ञ सांगतात, तर प्रेमात पडण्याचा गुरुत्वाकर्षाशी संबंध नाही असं आइन्स्टाइन सांगतात. त्यामुळे प्रेम म्हणजे काय? याची गोष्ट ‘I प्रेम U’ या अनोख्या चित्रपटात मांडली जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती चित्रपटाला चित्रपटगृहात मिळेल यात शंका नाही.

‘आय प्रेम यु’ या चित्रपटाची निर्मिती साईश्री एंटरटेन्मेंटच्या मधुकर गुरसळ, नितीन कहार यांनी केली आहे. नितीन कहार यांनीच लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. अविनाश सातोसकर यांनी छायांकन, संजू-संग्राम आणि यशोधन कदम यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री कयादू लोहार या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करत असून, कयादू आणि अभिजीत आमकर ही फ्रेश जोडी या चित्रपटात आहे.

‘आय प्रेम यु’ या चित्रपटातून साऊथ अभिनेत्री मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करणार आहे. आसाममधील तेजपूर येथे जन्म झालेल्या कयादू लोहारनं दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मुगीलपेटे, पोथानपाथम नूट्टांडू, अलुरी असे कन्नड, मल्याळममधील चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यानंतर आता ती मराठीत पाऊल टाकत आहे. तिच्याबरोबर ‘एक सांगायचंय’, ‘टकाटक’ अशा चित्रपटांतील अभिनयाचं कौतुक झालेला अभिनेता अभिजित आमकर या चित्रपटात दिसणार आहे.

IPL_Entry_Point