मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bholaa Trailer: दुष्ट शक्तींचा खात्मा करायला येतोय ‘भोला’! अजयच्या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

Bholaa Trailer: दुष्ट शक्तींचा खात्मा करायला येतोय ‘भोला’! अजयच्या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 06, 2023 04:07 PM IST

Bholaa Trailer Release: अजयचा ‘भोला’ हा चित्रपट बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे. अखेर आता त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Bholaa Trailer
Bholaa Trailer

Bholaa Trailer Release: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भोला’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. अजयचा हा चित्रपट बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे. अखेर आता त्याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये अजय देवगणची देसी स्टाईल पाहायला मिळत आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा त्याच्या विरुद्ध पोलिस गणवेशातील तब्बू उभी ठाकणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळाले आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमधून प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या आधीही प्रेक्षकांनी अजय देवगणला अॅक्शन सीन करताना पाहिले आहे. पण यावेळी तो हटके देसी अवतारात खूपच आक्रमक दिसत आहे. त्याचा लूक जबरदस्त आहे आणि या भोलेनाथचा आशीर्वादही त्याच्यावर आहे. कपाळावर टिळा, हातात त्रिशूल आणि डोळ्यात राग अजयचा हा लूक एकदम किलर आहे. चित्रपटातील अजयचा लूक आणि अॅक्शन पाहून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहे. तब्बूने देखील पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आपला जलवा दाखवला आहे. यामध्ये तिचे पात्र काहीसे ‘दृश्यम’शी मिळतेजुळते आहे.

काही दिवसांपूर्वी अजय देवगणने त्याच्या ‘भोला’ चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये त्याने कपाळाला भस्म, हातात त्रिशूल आणि थोडा जखमी दिसत होता. त्याच्या या लूकची जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर आता अजयच्या या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर देखील आता प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

‘भोला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अजय देवगणने केली आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी सहित तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग