मराठी बातम्या  /  Entertainment  /  Kartik Aryan Mother Mala Tiwari Wins Battle Against Cancer Actor Share Emotional Post

Kartik Aryan: कार्तिक आर्यनच्या आईने दिली कॅन्सरला मात! अभिनेत्याने शेअर केली इमोशनल पोस्ट...

Kartik Aryan Mother
Kartik Aryan Mother
Harshada Bhirvandekar • HT Marathi
May 06, 2023 09:12 AM IST

Kartik Aryan Mother: कार्तिक आर्यनने त्याच्या आईच्या या धाडसाचे आणि आयुष्य जगण्याच्या एका सकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे.

Kartik Aryan Mother: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. मात्र, आता अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. कार्तिकची आई माला तिवारीने कॅन्सरसारख्या धोकादायक आजारावर मात करून आयुष्यातील एक कठीण लढाई जिंकली आहे. कार्तिकने त्याच्या इंस्टाग्रामवर एक अतिशय भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने चाहत्यांना सांगितले आहे की, गेल्या काही महिन्यांमध्ये तो आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून गेला होता. पण, आता कार्तिक त्याच्या आयुष्यातील सुखद प्रवासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. कार्तिकने या पोस्टमध्ये म्हटले की, त्याच्या आईने आता कर्करोगावर मात केली आहे. अभिनेत्याने हा आनंद त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कार्तिक आर्यनने त्याच्या आईच्या या धाडसाचे आणि आयुष्य जगण्याच्या एका सकारात्मक दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे. त्याने इंस्टाग्रामवर आईचा फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये कार्तिक आर्यनने त्याच्या आयुष्यातील या कठीण काळाबद्दल सांगितले आहे. या पोस्टमध्ये भावनिक होत त्याने म्हटले की, कुटुंबाचे प्रेम आणि पाठिंबा यापेक्षा आयुष्यात मोठे काहीही नाही.

The Kerala Story Collection: ‘द केरळ स्टोरी’ची धमाकेदार सुरुवात; कमाईत ‘द काश्मीर फाईल्स’लाही टाकले मागे!

कार्तिकने आपल्या या पोस्टमध्ये लिहिले की, 'या महिन्यात बिग सी अर्थात 'कॅन्सर'चा आमच्या घरात शिरकाव झाला आणि त्याने आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आम्ही हताश, निराश आणि असहाय होतो. पण या लढवय्यीचे आभार, जिच्या इच्छाशक्ती आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीने या सगळ्यावर विजय मिळवला. आम्ही मोठ्या हिंमतीने आणि पूर्ण ताकदीने लढलो आणि जिंकलो. मात्र, यावरून एक गोष्ट समजली की, आपल्या कुटुंबाच्या प्रेम आणि पाठिंब्यापेक्षा मोठी शक्ती नाही.’

अभिनेता कार्तिक आर्यनच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. काही काळापूर्वी कार्तिनने एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो त्याच्या आईच्या कॅन्सरबद्दल बोलताना खूप भावूक झाला होता. केमोथेरपीबद्दल सांगताना कार्तिकचे डोळे भरून आले होते. आता मात्र त्याच्या आईने ही लढाई जिंकली आहे. कार्तिक त्याच्या आईच्या खूप जवळ आहे. अनेकदा त्याच्या आईसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.

WhatsApp channel

विभाग