Kartik Aaryan : बॉलिवूडचा ‘हँडसम हंक’ कार्तिक आर्यन लग्न बंधनात अडकणार? व्हिडीओमुळे चर्चांना उधाण!
Kartik Aaryan Marriage Announcement: अभिनेता कार्तिक आर्यनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो लग्नाची घोषणा करणार असल्याचे म्हणत आहे.
Kartik Aaryan Marriage Announcement: बॉलिवूड विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. यातच आता बॉलिवूडचा ‘हँडसम हंक’ कार्तिक आर्यन देखील लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याला कारणीभूत ठरलाय त्याने शेअर केलेला एक व्हिडीओ... कार्तिक आर्यनने शेअर केलेला व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन स्वतःच्या लग्नाची घोषणा करणार असल्याचे म्हटले जात आहे. एका अवॉर्ड नाईटमध्ये त्याने स्वतःच आपल्या लग्नाची घोषणा केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
अभिनेता कार्तिक आर्यनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक म्हणत आहे की, सगळ्यांची लग्न पाहून तोही आता लग्न करण्याचा विचार करत आहे. शनिवारी मुंबईत आयोजित एका अवॉर्ड नाईटमध्ये त्यांनी ढोल-ताशांसह मंचावर प्रवेश केला. यानंतर कार्तिक म्हणाला की, ‘तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की, मी इथे बँडबाजा का घेऊन आलो आहे?’ कार्तिकने हे बोलताच उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले.
यानंतर तो म्हणाला की, सगळीकडे ढोलताशे वाजत आहे, लोक लग्न करत आहेत. अनेकांची विकेट पडत आहे. मात्र, एका व्यक्तीची विकेट अजून पडलेली नाही. एलिजिबल सिंगल क्लबमध्ये मीच राहिलो आहे. पण, आता हा माणूस देखील पाघळत आहे. मी ही विचार करतोय की, आता लग्नाचा लाडू खाऊनच बघू. म्हणूनच सर्वांसमोर, झी सिने मंचाला साक्षीदार मानून, आज मला माझ्या सर्व चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला ही बातमी द्यायची आहे की, कार्तिक आर्यन लग्न करणार आहे.’ अर्थात हे एक विनोदी स्कीट होते. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
कार्तिक आर्यनच्या चित्रपटांसाठी चाहते उत्सुक आहेत. कार्तिककडे सध्या अनेक बिग बजेट चित्रपट आहेत. कार्तिक आर्यन लवकरच अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘कॅप्टन इंडिया’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘लुका छुप्पी २’ आणि दिग्दर्शक कबीर खानसोबतच्या आगामी चित्रपटात देखील कार्तिक झळकणार आहे.
विभाग