मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shehzada Trailer Out: शहजादा आला रे! कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाच्या ट्रेलरने घातला धुमाकूळ!

Shehzada Trailer Out: शहजादा आला रे! कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाच्या ट्रेलरने घातला धुमाकूळ!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 12, 2023 03:08 PM IST

Shehzada Trailer Out: कार्तिकच्या ‘शहजादा’चा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननची जोडी पाहायला मिळत आहे.

Shehzada Trailer
Shehzada Trailer

Shehzada Trailer : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘शहजादा’मुळे चर्चेत आहे. चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवायला आता या चित्रपटाचा ट्रेलर देखील आला आहे. कार्तिकच्या ‘शहजादा’चा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननची जोडी पाहायला मिळत आहे. ‘लुकाछुपी’नंतर पुन्हा एकदा ही जोडी मोठ्या पडद्यावर अप्रतिम दिसत आहे. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहून चाहते अक्षरशः जल्लोष आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हा चित्रपट अल्लू अर्जुनचा साऊथ चित्रपट ‘अलवैकुंठपुरम’चा रिमेक आहे. रोहित धवनने याचे दिग्दर्शन केले आहे. कार्तिक आणि क्रितीशिवाय या चित्रपटात परेश रावल, मनीषा कोईराला आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘शहजादा’ येत्या १० फेब्रुवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

‘शहजादा’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आता चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाशी संबंधित अपडेट जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या या नव्या लूकमुळे आणि खास सरप्राईजमुळे चाहते देखील खूश झाले आहेत.

कार्तिक आर्यन हा सध्या नव्या चित्रपटांच्या कामात अतिशय व्यस्त आहे. २०२२ हे वर्ष कार्तिकसाठी खूपच लकी ठरले होते. २०२२मध्ये यावर्षी त्याचा 'भूल भुलैया २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. यानंतर कार्तिककडे चित्रपटांची रांग लागली. ‘भूल भुलैय्या २’ आणि ‘फ्रेडी’नंतर ‘शहजादा’, ‘हेरा फेरी ३’ अशा बहुचर्चित चित्रपटांमध्ये कार्तिक मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

IPL_Entry_Point