मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kangana Ranaut: ‘पंगा क्वीन’ कंगना रनौत पुन्हा एकदा करण जोहरशी भिडली; म्हणाली...

Kangana Ranaut: ‘पंगा क्वीन’ कंगना रनौत पुन्हा एकदा करण जोहरशी भिडली; म्हणाली...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 10, 2023 11:51 AM IST

Kangana Ranaut Vs Karan Johar: कंगना आणि करण हे दोघेही एकमेकांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. एकमेकांचे नाव न घेता ते एकमेकांना खूप टोमणे मारतात.

Kangana Ranaut Vs Karan Johar
Kangana Ranaut Vs Karan Johar

Kangana Ranaut Vs Karan Johar: बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत असते. कंगनाची बेधडक वक्तव्य आणि तिने केलेली टीका नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता तिने पुन्हा एकदा करण जोहर विरोधात टीकेची झोड उठवली आहे. सोशल मीडियावरून कंगनाने पुन्हा एकदा करण जोहरला टोमणा मारला आहे. करण जोहर आणि कंगना रनौत यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. आता पुन्हा एकदा त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.

कंगना आणि करण हे दोघेही एकमेकांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. एकमेकांचे नाव न घेता ते एकमेकांना खूप टोमणे मारतात. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये करणने अनुष्का शर्माचे करिअर संपवल्याबद्दल बोलले जात होते. हा व्हिडीओ पाहून कंगना गप्प बसेल कशी? तिने लगेचच एक टोमणे मारणारी पोस्ट शेअर केली. यानंतर करणही गप्प बसला नाही, त्यानेही एक पोस्टही शेअर केली. त्यानंतर दोघांमधील वाद चांगलाच गाजायला लागला आहे.

Kangana VS Karan
Kangana VS Karan

आता त्यांच्यातील हा वाद आता आणखी वाढला आहे. आता कंगनाने लिहिले की, 'आता फक्त हिंदी सुधारली आहे, पुढे बघा आणि काय होते!' इंस्टाग्राम स्टोरीवर करण जोहरची पोस्ट शेअर करताना कंगना रनौतने टोमणा मारला की, ‘एक वेळ असा होता की, चाचा चौधरी मला इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे उच्चभ्रू नेपो माफिया लोकांसोबत नॅशनल टेलिव्हिजनवर माझा अपमान करत होते. आज त्याची हिंदी पाहून मला वाटले, फक्त त्याची हिंदीच सुधारली आहे, पुढे काय होते ते पाहू.’

याआधी करण जोहर याने एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने एक शेर लिहिला होता. यात त्याने लिहिले होते की, ‘लगा लो इल्जाम हम झुकने वालों में से नहीं, झूठ के बन जाओ गुलाम, हम बोलने वालों में से नहीं। जितना नीचा दिखाओगे, जितना आरोप लगाओगे... हम गिरने वालों में से नहीं। हमारा कर्म हमारी विजय है, आप उठा लो तलवार... हम मारने वालों में से नहीं।‘ या पोस्टनंतर दोघांमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत.

IPL_Entry_Point