मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hridayi Preet Jaagate: मनोहर आणि शैलजा यांच्यामध्ये नक्की कोणतं नातं?

Hridayi Preet Jaagate: मनोहर आणि शैलजा यांच्यामध्ये नक्की कोणतं नातं?

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 06, 2022 10:26 PM IST

Hridayi Preet Jaagate: ही मालिका आता एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.

हृदयी प्रीत जागते
हृदयी प्रीत जागते (HT)

सध्या मालिका विश्वात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ‘हृदयी प्रीत जागते’ असे या मालिकेचे नाव असून, या मालिकेचं कथानक संगीतावर आधारित असणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेता सिद्धार्थ खिरीड आणि अभिनेत्री पूजा कातुर्डे (Pooja Katurde) अशी नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

शैलजा ऑफिस मध्ये घोषणा करते की प्रभास नवीन वर्षात सदावर्ते कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय जॉईन करणार. इकडे वीणा प्रभास चा नंबर मिळवते आणि त्याला फोन करून उर्मीबद्दल खरं काय ते सांगायचं ठरवते. पण काही न काही कारणामुळे ती यशस्वी होत नाही. तर दुसरीकडे प्रभास ला वीणा आपल्या बँड मध्ये हवी आहे.

उर्मी ला कळतं कि वीणाने प्रभासला सत्य सांगण्यासाठी फोन केला म्हणून ती आणि मामी मिळून वीणा ला खूप बोलतात. मनोहर ला समजतं कि एका करारासाठी त्याला शैलजा ला सामोरं जावं लागणार आहे. मनोहर आणि शैलजा यांच्यामध्ये नक्की कोणतं नातं आहे? या दोघांमध्ये नक्की कोणता करार झालाय? असे अनेक प्रश्न चाहत्यांमा पडले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग