मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vedat Marathe Veer Daudale Saat : अक्षय कुमारला कशी मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?

Vedat Marathe Veer Daudale Saat : अक्षय कुमारला कशी मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 03, 2022 02:37 PM IST

Akshay kumar as Chhatrapati Shivaji Maharaj: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Akshay Kumar
Akshay Kumar

akshay kumar as Chhatrapati Shivaji Maharaj: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी नुकतीच त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषण केली आहे. महेश मांजरेकर पुन्हा एकदा एक ऐतिहासिक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान उलगडणारी कथा त्यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या त्यांच्या आगामी चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातून अक्षय मराठीत पदार्पण करणार आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महाराष्ट्राचा इतिहास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मराठी चित्रपट, मराठी कथानक आणि अनेक मराठी कलाकारांची फौज असतानानाही या चित्रपटात अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराज साकारण्याची संधी मिळाली आहे. आपल्याला ही भूमिका नेमकी कशी मिळाली, याचा खुलासा खुद्द अक्षय कुमारने केला आहे.

काय म्हणाला अक्षय कुमार?

या चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर, अक्षय कुमार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर एकत्र आले होते. या आगामी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका नक्की कोण साकारणार, याचा उलगडा यावेळी करण्यात आला. महेश मांजरेकर या खास व्यक्तीचं नाव घेत असतानाच, राज ठाकरे यांनी थेट या व्यक्तीला मंचावर येण्याची विनंती केली. यावेळी बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार उठून मंचावर आला आणि त्याने माध्यमांशी थेट मराठीत संवाद साधला. यावेळी अक्षयने आपल्याला ही भूमिका कशी मिळाली, याचा खुलासा केला.

अक्षय कुमार मंचावर येताच म्हणाला की, मी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका सकारायला मिळावी हे माझं स्वप्न होतं. पण ही भूमिका मला मिळण्यामागे एका व्यक्तीचं श्रेय आहे, ते म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे यांनी मला सांगितलं की, अक्षय तू ही भूमिका करायला हवी, तू करू शकतोस. त्यांच्या आग्रहामुळेच ही भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. यावेळी अक्षय कुमारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील आपण पहिल्यांदाच भेटत असून, आनंद झाल्याचे म्हटले.

IPL_Entry_Point