मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Birthday: जेव्हा महेश मांजरेकरांना आला होता अंडरवर्ल्डकडून फोन; केलेली 'ही' डिमांड

Birthday: जेव्हा महेश मांजरेकरांना आला होता अंडरवर्ल्डकडून फोन; केलेली 'ही' डिमांड

Payal Shekhar Naik HT Marathi
Aug 16, 2022 09:24 AM IST

Mahesh Manjrekar Birthday: फोन करणाऱ्या व्यक्तीने म्हटलं की मी अबू सालेमचा माणूस आहे. त्यावेळी महेश मांजरेकर थोडेसे घाबरले पण...

महेश मांजरेकर
महेश मांजरेकर

ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर हे अनेक दशकांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मांजरेकर आज त्यांचा ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या कामाचे बरेच चाहते आहेत आणि त्याचं स्वतःचं फॅन फॉलोइंग देखील आहे, परंतु जिथे चाहते आहेत तिथे काही विरोधक देखील असतात. महेश यांनाही अशा एका व्यक्तीने त्रास दिला आहे. आज आम्ही तुम्हाला तो किस्सा सांगणार आहोत जेव्हा महेश मांजरेकर यांना 'अबू सालेम'चा फोन आला होता.

ट्रेंडिंग न्यूज

खरंच आला होताअबू सालेमच्या माणसाचा फोन?

ही गोष्ट फार जुनी आहे. एके दिवशी महेश यांच्या घरी एक फोन आला. तो म्हणाला की मी अबू सालेमचा माणूस आहे. या फोननंतर महेश काही काळ घाबरले. कारण तेव्हा अंडरवर्ल्डचं प्रस्थ फार मोठं होतं. अनेकांना दिवसाढवळ्या गोळ्या घालून मारण्यात येत होतं. मात्र हा एक खोटा कॉल होता ज्याची महेश यांनी पोलिसांत तक्रार केली होती. फोन करणारा माणूस स्वत:ला अबू सालेमचा माणूस सांगत होता आणि त्याने मांजरेकर यांच्याकडे तब्बल 35 कोटी रुपयांची मागणी केली होती. फोन करणारा व्यक्ती महेश यांना दररोज धमकीचे मेसेज पाठवत होता, त्यानंतर महेशने पोलिसांत तक्रार दाखल केली.

संजय दत्तच्या 'वास्तव' ते 'अंतिम' पर्यंत

मांजरेकर यांनी मराठी चित्रपट, नाटक आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही उल्लेखनीय काम केलं आहे. बॉलीवूडमध्ये त्यांनी आतापर्यंत 'वास्तव', 'मुसाफिर', 'जिंदा', 'ओह माय गॉड' आणि 'शूट आउट अॅट वडाळा' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

महेश मांजरेकर यांचा चित्रपट प्रवास

महेश यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं तर ते सलमान खानच्या 'अंतिम' चित्रपटात दिसले होते. त्यांनी १९८४ साली 'अफलातून' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांना खरं तर दिग्दर्शक व्हायचं होतं पण योगायोगाने ते अभिनेते देखील झाले.

IPL_Entry_Point

विभाग