मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Meaning Of Moye Moye: ट्रेंडमध्ये असलेल्या ‘मोये मोये’चा अर्थ काय? गायकानेच केला खुलासा

Meaning Of Moye Moye: ट्रेंडमध्ये असलेल्या ‘मोये मोये’चा अर्थ काय? गायकानेच केला खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 03, 2024 01:41 PM IST

What is Moye Moye : ‘मोये मोये’ या गाण्यावर दलेर मेहंदी यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी भारतीयांना थीरकायला लावले होते. आता या शब्दाचा अर्थ काय? हे समोर आले आहे.

Moye Moye
Moye Moye

सध्या सोशल मीडियावर 'मोये मोये' या सर्बियन गाण्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या गाण्याचे बोले अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. हा ट्रेंड टिकटॉकमुळे सेट झाला आहे. कारण अनेक टीकटॉकर्सनी डझनम गाण्यातील ‘मोये मोये’ हा एक भाग घेऊन त्यावर त्यांना आवडतील तसे व्हिडीओ बनवून शेअर केले. हे व्हिडीओ इतके व्हायरल झाले की सध्या फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्रामवर केवळ या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. पण या शब्दांचा अर्थ काय? असा प्रश्न मात्र सर्वांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सर्वात आधी मोये मोये हे गाणे भारतीय पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी गायले होते. हो तुम्ही बरोबर ऐकलत. ‘मोये मोये’ या गाण्यावर दलेर मेहंदी यांनी बऱ्याच वर्षांपूर्वी भारतीयांना थीरकायला लावले होते. त्यांचे हे गाणे तुफान हिट झाले होते. आता या गाण्याची चर्चा सुरु असताना सर्वांना या शब्दांचा अर्थ नेमका काय होतो हे जाणून घ्यायचे आहे. चला जाणून घेऊया...
वाचा: श्रेया बुगडेची 'जाऊ बाई गावात'मध्ये एण्ट्री, टास्क करणार की सल्ला देणार?

नुकताच दलेर यांनी ‘द लल्लनटॉप’च्या ‘गेस्ट इन द न्यूजरूम’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीदरम्यानच दलेर मेहंदी यांनी ‘मोये मोये’चा नेमका अर्थ काय हे सांगितले आहे. ते म्हणाले, “या गाण्याचा अर्थ म्हणजे मरून जाणे. जसे ‘चुन्नी नाल मुखड़े नू ढकनी, अंसी मोये-मोये’ या संपूर्ण ओळीचा अर्थ असा की तू तुझा चेहेरा ओढणीने लपव नाहीतर माझे काही खरे नाही.”

१९९६ सालच्या ‘दर्दी रब रब’ या अल्बमसाठी दलेर मेहंदी यांनी हे ‘मोये मोये’ गाणं रेकॉर्ड केले होते. सध्या सोशल मीडियावर दलेर मेहंदी यांचे गाणे आणि सर्बियन गाणे यांची तुलना करून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

IPL_Entry_Point

विभाग