मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hardeek-Akshaya: लग्न सोहळा उरकताच ‘राणादा-पाठकबाई’ देव दर्शनाला रवाना! फोटो शेअर करत म्हणाले…

Hardeek-Akshaya: लग्न सोहळा उरकताच ‘राणादा-पाठकबाई’ देव दर्शनाला रवाना! फोटो शेअर करत म्हणाले…

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 11, 2022 01:22 PM IST

Hardeek-Akshaya: लग्नसोहळा आणि घरातील पूजा आटोपून आता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांच्या दर्शनाला रवाना झाले आहेत.

Hardeek Akshaya
Hardeek Akshaya

Hardeek Joshi-Akshaya Deodhar: मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय जोडी राणादा आणि पाठक बाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. रील लाईफमधली ही जोडी आता रियल लाईफमध्ये देखील एकत्र आली आहे. नुकताच त्यांचा विवाह सोहळा पार पडला. यानंतर आता हार्दिक अक्षया देवदर्शनाला रवाना झाले आहेत. नुकतेच त्यांनी नाशिकला जाऊन देवी सप्तशृंगीचे दर्शन घेतले. ‘आशीर्वाद मिळाला..’ असं म्हणत त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हार्दिक आणि अक्षयाचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. मेहंदी सोहळ्यापासून ते सप्तपदीपर्यंत सगळेच अपडेट दोघांनी आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. आता लग्नानंतर देखील ही जोडी सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. लग्नसोहळा आणि घरातील पूजा आटोपून आता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांच्या दर्शनाला रवाना झाले आहेत. याचे फोटो देखील ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

हार्दिक आणि अक्षयाच्या लग्न सोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले जात होते. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून ‘राणा दा’ आणि ‘पाठक बाई’ ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. अभिनेता हार्दिक जोशी या मालिकेत ‘राणा दा’ साकारत होता. तर, अभिनेत्री अक्षया देवधर हिने ‘अंजली पाठक’ ही भूमिका साकारली होती.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या निमित्ताने खऱ्या आयुष्यात देखील राणा आणि अंजलीचा जीव एकमेकांमध्ये रंगला आहे. या वर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. आता ही जोडी लग्नबंधनात देखील अडकली आहे. हार्दिक आणि अक्षयच्या लग्न सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता ही जोडी देवदर्शनाला निघाली असून, याची झलक त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग