मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Reena Roy Birthday : शत्रुघ्न सिन्हाशी प्रेमाची चर्चा सुरू असतानाच रीना रॉयने बांधली होती पाक क्रिकेटरशी लग्नगाठ!

Reena Roy Birthday : शत्रुघ्न सिन्हाशी प्रेमाची चर्चा सुरू असतानाच रीना रॉयने बांधली होती पाक क्रिकेटरशी लग्नगाठ!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 07, 2023 08:32 AM IST

Happy Birthday Reena Roy: ३० वर्षांच्या कारकिर्दीत रीना रॉय यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र, चित्रपटांपेक्षाही रीना शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत राहिल्या.

Reena Roy Love story
Reena Roy Love story

Happy Birthday Reena Roy: ९०च्या दशकांत बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री रीना रॉय आज (७ जानेवारी) आपला ६६वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री रीना रॉय यांचा जन्म ७ जानेवारी १९५७ रोजी झाला. जवळपास ३० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र, चित्रपटांपेक्षाही रीना रॉय, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत होत्या. 'जरूरत' चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणाऱ्या रीना यांच्या प्रेमाचे अनेक किस्से चर्चेत होते.

ट्रेंडिंग न्यूज

पहिल्याच चित्रपटात रीना त्यांचे अनेक संवाद विसरल्या होत्या. परिणामी त्यांच्या हातून अनेक चित्रपट निसटले होते. त्यांचा पहिला चित्रपट हिट झाला नाही, पण या चित्रपटाने रीना रॉय या नवख्या चेहऱ्याला ओळख मिळवून दिली. अल्पावधीतच हा नवखा चेहरा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक बनला. रीना रॉय यांची जोडी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर प्रचंड गाजली. चित्रपटात काम करत असताना, ते एकमेकांच्या प्रेमात देखील आकंठ बुडाले होते. शत्रुघ्न आणि रीना यांनी तब्बल डझनभराहून अधिक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते, त्यापैकी बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते.

दोघांच्या प्रेमाच्या चर्चा संपूर्ण बॉलिवूडमध्ये सुरू होत्या. १९८२मध्ये दिग्दर्शक पहलाज रीना, शत्रुघ्न आणि संजीव कुमारसोबत 'हथकडी' हा चित्रपट बनवत होते. या चित्रपटापूर्वीच शत्रुघ्न आणि रीना यांच्यातील प्रेम फुलले होते. पण, १९८०मध्ये शत्रुघ्नने पूनम सिन्हांसोबत लग्न केले. लग्नानंतरही त्यांचे रीनासोबतचे नाते ७ वर्षे टिकले होते. पण, हळूहळू रीनाला वाटू लागलं की, शत्रुघ्न आपल्याशी लग्न करणार नाही. त्यामुळे हळूहळू त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला.

या दरम्यान त्यांच्या नात्याचा चित्रपटावरही परिणाम होऊ लागला. रीना यांना वाटू लागले की, शत्रुघ्न आपल्याशी लग्न करणार नाही, तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत चित्रपट करण्यास देखील नकार दिला. माझ्याशी लगेच लग्न केले नाही, तर येत्या आठ दिवसांत कुणाशी तरी लग्न करेन, अशी अट देखील त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना घातली. मात्र, शत्रुघ्न यांच्या बाजूने काहीच प्रतिक्रिया न आल्याने रीना रॉय यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानसोबत लग्नगाठ बांधली. या जोडीला एक मुलगी देखील आहे. मात्र, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. त्यांनी काहीच वर्षांत घटस्फोट घेतला.

IPL_Entry_Point

विभाग