मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Abhijit Bichukale: अभिजीत बिचुकले कुठे आहे?; देवोलीनाने लग्न करताच चाहत्यांना झाली आठवण Video Viral

Abhijit Bichukale: अभिजीत बिचुकले कुठे आहे?; देवोलीनाने लग्न करताच चाहत्यांना झाली आठवण Video Viral

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 15, 2022 05:06 PM IST

Devoleena bhattacharjee: अभिजीत बिचुकले आणि देवोलीना भट्टाचार्जी हे बिग बॉस १५मध्ये एकत्र दिसले होते. त्यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते होते.

देवोलिना आणि अभिजीत बिचुकले
देवोलिना आणि अभिजीत बिचुकले (HT)

‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून गोपी बहू ही घराघरात पोहोचलेली. आता गोपी बहू ही भूमिका साकारणारी अभिनेत्री देवोलीना भट्टचार्जी लग्न बंधनात अडकली आहे. देवोलीनाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत जीम ट्रेनर शहनवाज शेखशी लग्न केले. त्यानंतर सर्वांना अभिजीत बिचुकलेची आठवण आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिजीत बिचुकलेने बिग बॉस १५मध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली होती. याच सिझनमध्ये देवोलीना भट्टाचार्जी देखील सामील झाली होती. शोमध्ये देवोलीना आणि अभिजीत यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते होते. पण अनेकदा देवोलीना अभिजीतसोबत भांडताना देखील दिसली होती. पण बिचुकले पुन्हा देवोलीनाचे मन जिंकायचे. विकेंडच्या वारमध्ये सलमान बिचुकले आणि देवोलीनाला चिडवायचा.
वाचा: ब्रेकअपनंतर एक्ससोबत इंटिमेट झाले होते; प्रियांका चोप्राचा खुलासा

आता देवोलीनाने लग्न करताच नेटकऱ्यांना बिचुकलेची आठवण झाली आहे. काहींनी बिचुकले आणि देवोलीनाचे व्हिडीओ पुन्हा इंटरनेटवर शेअर केले आहेत. या व्हिडीओंमध्ये देवोलीना आणि बिचुकले यांच्यामधील मैत्री स्पष्ट दिसत आहे. त्यांच्यामध्ये चांगले मैत्रीचे नाते होते.

देवोलीनाने जीम ट्रेनर शहनवाज शेखशी लग्न केले. तिने लग्नातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत, ‘मी अभिमानाने सांगू शकते की मी माझं लग्न झालंय आणि होय शोनू.. दिवा घेऊन शोधले असते तरी तुझ्यासारखा भेटला नसता. माझी दु:खं आणि प्रार्थनांचं उत्तर तू आहेस. तुझ्यावर मी खूप प्रेम करते’, असे कॅप्शन दिले आहे.

IPL_Entry_Point

विभाग