मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Devoleena Bhattacharjee: लग्नाला लव्ह-जिहाद म्हणणाऱ्या नेटकऱ्यावर संतापली देवोलिना! म्हणाली ‘तुम्ही आम्हाला...’

Devoleena Bhattacharjee: लग्नाला लव्ह-जिहाद म्हणणाऱ्या नेटकऱ्यावर संतापली देवोलिना! म्हणाली ‘तुम्ही आम्हाला...’

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 20, 2023 10:17 AM IST

Devoleena Bhattacharjee replay on Love Jihad: देवोलिना भट्टाचार्जीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या युजर्सची शाळा घेणं सुरू केलं आहे.

Devoleena Bhattacharjee
Devoleena Bhattacharjee

Devoleena Bhattacharjee replay on Love Jihad: छोट्या पडद्यावरील ‘गोपी बहू’ म्हणजेच टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. देवोलिना भट्टाचार्जीचे लग्न हा नेटकऱ्यांसाठी मोठा चर्चेचा मुद्दा बनला आहे. देवोलिना भट्टाचार्जी बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही मालिकेत दिसलेली नाही. बिग बॉसच्या घरात झळकल्यानंतर देवोलिनाने अचानक शनवाज शेखसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले. गोपी बहू म्हणजेच देवोलिना भट्टाचार्जी हिचा पती शानवाज शेख हा मुस्लिम धर्मीय आहे. त्यामुळे या दोघांच्या लग्नाबाबत रोजच नवे प्रश्न ऐकायला मिळतात.

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, देवोलिना भट्टाचार्जीने पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या युजर्सची शाळा घेणं सुरू केलं आहे. यापूर्वी देवोलिनाने एका ट्विटद्वारे सांगितले होते की, तिने तिच्या पतीसोबत जाऊन ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाहिला आणि तिला हा चित्रपट खूप आवडला आहे. आता एका युजरने अभिनेत्रीच्या लग्नाला ‘लव्ह जिहाद’ म्हटले आहे. त्यानंतर देवोलिनाचा राग तिच्या ट्विटमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. मात्र, कोणताही चुकीचा शब्द न वापरता अभिनेत्रीने युजरला चोख उत्तर दिले आहे.

साध्वी प्राचीने उत्तराखंडमधील हरिद्वार येथील ‘द केरळ स्टोरी’च्या स्क्रिनिंगचे फोटो ट्विटरवर शेअर केल्यावर हा वाद सुरू झाला. त्यांनी एक फोटो शेअर करत लिहिले होते की, ‘केरळ स्टोरी' हा चित्रपट हरिद्वारमध्ये मुलींना पूर्णपणे मोफत दाखवली जाईल. यानंतर एका युजरने कमेंट करताना देवोलिनाच्या लग्नावर टीका केली, ज्यावर आता टीव्ही अभिनेत्रीने खूप चांगले उत्तर दिले. देवोलिनाने लिहिले, ‘अरे खान साहेब, त्यांनी आम्हाला बोलवण्याची गरज नव्हती. मी आणि माझा पती आम्ही दोघेही आधीच ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट बघून आलो आहोत आणि आम्हाला हा चित्रपट खूप आवडला आहे.’

देवोलिना भट्टाचार्जी पुढे म्हणाली की, ‘तुम्ही खरे भारतीय मुस्लिम हे कधी ऐकले आहे का? माझा पती अशा लोकांपैकीच एक आहे, ज्याच्याकडे चुकीच्या गोष्टींविरुद्ध बोलण्याची ताकद आणि धैर्य दोन्ही आहे.’ या उत्तरासाठी तिचे चाहते देवोलिनाचे खूप कौतुक करताना दिसत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग