मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan Injury : शूटिंग सुरू असताना सलमान खानला गंभीर दुखापत, फोटो शेयर करत म्हणाला...

Salman Khan Injury : शूटिंग सुरू असताना सलमान खानला गंभीर दुखापत, फोटो शेयर करत म्हणाला...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 18, 2023 09:36 PM IST

Salman Khan Injury : चित्रपटाची शूटिंग सुरू असताना सलमान खानला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Salman Khan Injury News
Salman Khan Injury News (Girish Srivastav)

Salman Khan Injury News : 'किसी का भाई किसीकी जान' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉलिवूडचा दबंग भाईजान आणि अभिनेता सलमान खान हा पुढील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे. सलमानचा टायगर ३ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु आता या सलमानच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. टायगर ३ या चित्रपटाची शूटिंग सुरू असतानाच सलमान खानला गंभीर दुखापत झाल्याची घटना समोर आली आहे. खुद्द सलमान खानने स्वत:चा एक फोटो शेयर करत टायगर जखमी झालेला असल्याचं म्हटलं आहे. सलमानच्या डाव्या खांद्याला गंभीर मार लागला असून त्याने उपचार घेतल्यानंतर खांद्याला पट्टी लावलेला फोटो शेयर केला आहे. त्यामुळं आता चर्चांना उधाण आलं आहे. चाहत्यांनी सलमानला दुखापत झाल्यामुळं चिंता व्यक्त केली आहे.

सलमान खानने इन्स्टाग्रामवर फोटो शेयर करत म्हटलं आहे की, संपूर्ण जगाचं ओझं तुमच्यावर आहे, असं तुम्हाला वाटतं. परंतु जगाचं जाऊ द्या, पाच किलोचा डम्बेल उचलून दाखवा, असं म्हणत सलमानने टायगर जखमी है, असं कॅप्शन दिलं आहे. टायगर ३ या चित्रपटाची शूटिंग सुरू असताना त्याच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्याचं व्हायरल फोटोतून दिसत आहे. सलमानला झालेली दुखापत किती गंभीर आहे, हे समजू शकलेलं नाही. परंतु जीम करत असताना सलमानने दुखापतीचा फोटो शेयर केल्यामुळं त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. सलमानने शेयर केलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सलमानचा टायगर ३ हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली येणार आहे. त्यात अभिनेत्री कतरिना कैफ ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टायगर चित्रपटांच्या दोन सिरिज यशस्वी झाल्यानंतर सलमान आणि कतरिना पुन्हा तिसऱ्या चित्रपटात एकत्र आले आहे. पुढच्या वर्षी दिवाळीच्या दिवशी टायगर ३ चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु आता या चित्रपटाची शूटिंग सुरू असताना सलमान खानला गंभीर दुखापत झाल्यामुळं चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

IPL_Entry_Point