मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Kerala Story: 'द केरळ स्टोरी'ची कथा सत्यच; पीडित मुली अखेर कॅमेऱ्यासमोर

The Kerala Story: 'द केरळ स्टोरी'ची कथा सत्यच; पीडित मुली अखेर कॅमेऱ्यासमोर

Aarti Vilas Borade HT Marathi
May 18, 2023 08:36 AM IST

The Kerala Story: ‘द करेळ स्टोरी’ हा चित्रपट ३२ हजार महिलांवर आधारित आहे. या पैकी काही मलहिला आता कॅमेरासमोर आल्या आहेत.

The Kerala Story
The Kerala Story

अभिनेत्री अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटावर काही ठिकाणी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे तर काही ठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. चित्रपटात केरळच्या तीन मुलींची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यांचे धर्मांतर केले जाते. या चित्रपटाची कथा खोटी असल्याचा अनेकांनी आरोप केला. आता या मुली कॅमेरा समोर आल्या असून हा चित्रपट सत्य घटनेवर असल्याचा दावा त्यांनी केला.

ट्रेंडिंग न्यूज

१७ मे रोजी सिनेमाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली,जिथे ते अर्थ विद्या समाजम संस्थेच्या जवळपास २६ मुलींना घेऊन समोर आले. त्यांनी दावा केला आहे की या सगळ्या मुलींचे धर्मांतर झाले होते.
वाचा: टीव्हीला वाळवी लागणार ! महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पाहायला मिळणार सिनेमा

पत्रकार परिषदेत 'द करेळ स्टोरी' चित्रपटाच्या निर्मात्यांनी पीडित मुलींना सर्वांसमोर आणले. त्यापैकी एका मुलीने तिचा अनुभव सांगितला की, तिला रोज असे ५ ते १० कॉल येतात ज्यामध्ये लोक सांगतात की त्यांच्या कुटुंबात मुलींसोबतच नाही तर मुलांसोबत देखील हे होत आहे. तसेच दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी श्रुती नावाच्या मुलीचा उल्लेख केला. या मुलीला धर्मांतराचा सामना करावा लागला होता. जेव्हा चित्रपटाच्या कथेसाठी त्यांनी श्रुतीच्या घरी जाऊन भेट घेतली तेव्हा तेथे लाइट देखील नसल्याचे सांगितले.

जेव्हा त्या बाजारातून भाजी घेऊन यायच्या तेव्हा त्यांच्या हातातील बॅगा खेचून घेतल्या जायच्या. सुदिप्तो यांनी श्रुती विषयी म्हटलं की ते लोक काही न खाता-पिता आणि वीजेविना दिवस काढायचे. पुढे ते म्हणाले की, 'द केरळ स्टोरी' सिनेमानंतर जगातील कानाकोपऱ्यातून तिला कॉल येतायत आणि मुलं-मुली यांच्यासोबतच त्यांचे कुटुंबिय देखील सांगतायत की त्यांच्यासोबतही असं घडलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग