मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 16: बिग बॉस १६च्या घरात पुन्हा ट्वीस्ट; अब्दू-साजिद पुन्हा परतणार? प्रोमो व्हायरल

Bigg Boss 16: बिग बॉस १६च्या घरात पुन्हा ट्वीस्ट; अब्दू-साजिद पुन्हा परतणार? प्रोमो व्हायरल

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 21, 2023 11:48 AM IST

Bigg Boss 16 Latest Update: अब्दू रोजिक हा ‘बिग बॉस १६’मधील असा एक स्पर्धक होता, ज्याला केवळ प्रेक्षकांकडूनच नव्हे तर घरातील सदस्यांकडूनही खूप प्रेम मिळाले.

Bigg Boss 16
Bigg Boss 16

Bigg Boss 16 Latest Update:बिग बॉस १६’चा खेळ आता अंतिम टप्प्याकडे सरकत अआहे. अशावेळी घरातील स्पर्धक आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करताना दिसत आहेत. अशावेळी या खेळत पुन्हा एक मोठा ट्वीस्ट येणार असल्याचे संकेत मिळाले आहे. या शोचा एक नवा प्रोमो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यात बिग बॉसमध्ये अब्दू रोजिक आणि साजिद खान परतताना दिसले आहेत.

अब्दू रोजिक हा ‘बिग बॉस १६’मधील असा एक स्पर्धक होता, ज्याला केवळ प्रेक्षकांकडूनच नव्हे तर घरातील सदस्यांकडूनही खूप प्रेम मिळाले. त्याचे या घरातून जाणे चाहत्यांसाठी तसेच कुटुंबातील सदस्यांसाठी मोठा धक्का होता. पण, बिग बॉस आणि अब्दूप्रेमींना पुन्हा एकदा शोमध्ये त्याची झलक पाहायला मिळणार आहे. तसेच, साजिद खानही या शोमध्ये परतणार आहे.

अब्दू रोजिकने काही आठवड्यांपूर्वी शोला अलविदा केला होता. कामाच्या कमिटमेंट्समुळे त्याला बिग बॉस अर्ध्यातच सोडावे लागले होते. यामुळेच तो बाहेर पडल्यावर अनेकांची मने भरून आली होती. पण, आता अब्दू पुन्हा शोमध्ये दिसणार आहे. 'बिग बॉस'चा जावई म्हटला जाणारा साजिद खानही त्याच्यासोबत दिसणार आहे. नुकताच आगामी एपिसोडचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दोघे बिग बॉसच्या सेटवर सलमान खानसोबत हसताना आणि विनोद करताना दिसत आहेत.

अब्दू बिग बॉसमध्ये परतला आहे, पण खेळत नाही. अब्दू त्याच्या गाण्याच्या प्रमोशनसाठी ‘बिग बॉस १६’च्या मंचावर आला आहे. तो त्याच्या 'प्यार' या अल्बमच्या प्रमोशनसाठी आला आहे. या भागाचा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. वीकेंड का वार भागामध्ये प्रेक्षकांना एकदा अब्दूची झलक पाहायला मिळणार आहे. ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर अब्दूने त्याचे नवीन गाणे 'प्यार' रिलीज केले होते. मुंबईत अनेक ठिकाणी आपल्या गाण्याचे प्रमोशन केल्यानंतर अब्दू आता बिग बॉसमध्येही या गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी येणार आहे.

IPL_Entry_Point