मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Athiya Shetty Wedding: अथियाच्या लग्नात सेलिब्रिटींची मांदियाळी; ‘आई’ मान्या शेट्टीने केला खास डान्स!

Athiya Shetty Wedding: अथियाच्या लग्नात सेलिब्रिटींची मांदियाळी; ‘आई’ मान्या शेट्टीने केला खास डान्स!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 23, 2023 07:44 AM IST

Athiya Shetty-KL Rahul Wedding: केएल राहुल आणि अथिया शेट्टी बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. आज ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे.

Athiya Shetty-KL Rahul Wedding
Athiya Shetty-KL Rahul Wedding

Athiya Shetty-KL Rahul Wedding: बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल आज विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांचे प्री-वेडिंग सोहळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाला आहेत. रविवारी संध्याकाळी खास संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता. अभिनेता सुनील शेट्टी यांच्या खंडाळा फार्महाऊसवर सर्व कार्यक्रम पार पडत आहेत. या भव्य लग्नाची तयारी खूप आधीपासूनच सुरू झाली होती. संगीत सोहळ्यात जवळचे लोकच उपस्थित होते. त्यांच्या बंगल्याबाहेरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या लग्न सोहळ्यासाठी सुनील शेट्टीचा बंगला रंगीबेरंगी लाईट्सनी सजवण्यात आला होता

ट्रेंडिंग न्यूज

केएल राहुल आणि अथिया शेट्टीने २०२०मध्ये इंस्टाग्रामवर अधिकृतपणे त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. आज म्हणजेच २३ जानेवारीला ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहेत. रविवारी सकाळी सुनील शेट्टी याने माध्यमांना सांगितले की, लग्न झाल्यावर तो स्वतः दोघांना घेऊन फोटो काढण्यासाठी येणार आहे. मात्र, लग्नाआधी अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या फार्महाऊसवर पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. बॉलिवूडचा दिग्गज फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ संगीत सोहळ्यात सामील होताना दिसला.

लेक अथियाच्या संगीत सोहळ्यामध्ये सुनील शेट्टीची पत्नी माना शेट्टी आणि मुलगा अहान शेट्टी यांनी खास डान्स केला होता, अशी माहिती पिंकविलाने दिली आहे. अथियाची जवळची मैत्रीण आकांक्षा रंजन कपूरच्या डान्स परफॉर्मन्सचीही चर्चा सुरू आहे. मात्र, अथिया आणि केएल राहुलच्या डान्सचा व्हिडीओ अद्याप समोर आलेला नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नात जवळपास १०० पाहुणे असणार आहेत. या जोडप्याने आपला विवाह सोहळा खाजगी ठेवण्यासाठी फोन न आणण्याचा नियम लागू केला आहे. म्हणजेच लग्नादरम्यान पाहुण्यांना आपले मोबाईल फोन आणण्यास सक्त मनाई आहे. या लग्नसोहळ्यात बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये सलमान खान, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार यांसारख्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.

IPL_Entry_Point

विभाग