मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Athiya Shetty-KL Rahul Wedding: अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नात सामील होणार दिग्गज सेलिब्रिटी! पण...

Athiya Shetty-KL Rahul Wedding: अथिया शेट्टी-केएल राहुलच्या लग्नात सामील होणार दिग्गज सेलिब्रिटी! पण...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 22, 2023 02:44 PM IST

Athiya Shetty-KL Rahul Wedding: सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नबंधनात अडकणार आहे.

Athiya-KL Rahul
Athiya-KL Rahul

Athiya Shetty-KL Rahul Wedding: बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी-अभिनेत्री अथिया शेट्टी क्रिकेटर-बॉयफ्रेंड केएल राहुलसोबत २३ जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहे. सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्महाऊसवर अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नासाठी सुनील शेट्टीचे खंडाळ्यातील घरही सजवण्यात आले आहे. सध्या लग्नाच्या ठिकाणाहून अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये अभिनेत्याच्या खंडाळ्यातील घरामध्ये सर्वत्र सजावट आणि रोषणाई पाहायला मिळत आहे.

अभिनेता सुनील शेट्टीच्या खंडाळा हाऊस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये लग्नाच्या भव्य सजावटीची झलक पाहायला मिळत आहे. अथिया-केएल राहुलच्या लग्नासाठी ही सर्व तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. आथिया-केएल राहुलच्या लग्नात अनेक दिग्गज मंडळी सहभागी होणार आहेत. मात्र, या सगळ्यांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नात जवळपास १०० पाहुणे असणार आहेत. या जोडप्याने आपला विवाह सोहळा खाजगी ठेवण्यासाठी फोन न आणण्याचा नियम लागू केला आहे. म्हणजेच लग्नादरम्यान पाहुण्यांना आपले मोबाईल फोन आणण्यास सक्त मनाई आहे. या लग्नसोहळ्यात बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. ज्यामध्ये सलमान खान, जॅकी श्रॉफ, अक्षय कुमार यांसारख्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.

या शाही लग्नात क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजही सहभागी होणार आहेत. महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहली देखील केएल राहुलच्या लग्न सोहळ्यात सामील होणार आहेत. अथिया आणि केएल राहुलचे कुटुंब या शाही लग्नासाठी खूप उत्सुक आहे. केएल राहुल आणि अथिया शेट्टीने २०२०मध्ये इंस्टाग्रामवर अधिकृतपणे त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते.

IPL_Entry_Point

विभाग