मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mazhi Tuzhi Reshimgath: अनुष्काला आठवणार तिचा भूतकाळ; परी आणि नेहा पुन्हा एकत्र येणार?

Mazhi Tuzhi Reshimgath: अनुष्काला आठवणार तिचा भूतकाळ; परी आणि नेहा पुन्हा एकत्र येणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 22, 2023 02:04 PM IST

Mazhi Tuzhi Reshimgath: गेल्या अनेक महिन्यांपासून या मालिकेने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या मालिकेत आतापर्यंत अनेक ट्वीस्ट आणि टर्न्स पाहायला मिळाले.

Mazhi Tuzhi Reshimgath
Mazhi Tuzhi Reshimgath

Mazhi Tuzhi Reshimgath: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या मालिकेने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या मालिकेत आतापर्यंत अनेक ट्वीस्ट आणि टर्न्स पाहायला मिळाले. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे आणि मायरा वायकूळ या तिघांनी या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनोरंजन केले आणि त्या तिघांना प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. गेल्या काही दिवसांपासून नेहाची स्मृती गेल्याचा ट्रॅक या मालिकेत सुरू आहे.

नेहा, परी आणि यश यांच्या कारचा अपघात होतो. या अपघातात नेहा दरीत कोसळल्याने ती देवाघरी गेली असा सगळ्यांचाच समज झाला होता. मात्र, नेहा जखमी अवस्थेत एका हॉस्पिटलमध्ये मेहता कुटुंबाला सापडते. यावेळी नेहाची स्मृती गेल्याचे त्यांना समजले आणि त्यांनी आपली मुलगी म्हणून आपल्या घरी आणले. नेहाची अनुष्का मेहता झाली. मात्र, योगायोगाने नेहा आणि यशची पुन्हा भेट झाली. या भेटील नेहा आणि यश परत एकमेकांवर प्रेम करू लागले होते. मात्र, त्यांच्या प्रेमाला मेहतांचा विरोध होता.

चिमुकली परी देखील अनुष्काला आपली आई समजू लागली होती. आता आई आल्याशिवाय मी इंजेक्शन घेणार नाही आणि जेवणार देखील नाही, असा फर्मान परीने काढला आहे. त्यामुळे ऐन साखरपुड्यातून अनुष्का परीला भेटायला पॅलेसवर येणार आहे. यावेळी परीला रडताना पाहून अनुष्काच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होणार आहेत. आपणच नेहा असल्याची जाणीव देखील तिला होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा परीला तिची आई परत मिळणार आहे.

अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या मालिकेच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे याने मराठी मालिका विश्वात पदार्पण केले होते. तर, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने देखील छोट्या पडद्यावर पुनरागमन केले होते. या मालिकेतील चिमुकल्या परीने अर्थात बालकलाकार मायरा वायकूळ हिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.

IPL_Entry_Point