मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Majhi Tujhi Reshimgath: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ घेणार निरोप, ही नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Majhi Tujhi Reshimgath: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ घेणार निरोप, ही नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 10, 2023 10:44 PM IST

या नव्या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

नवी मालिका
नवी मालिका (HT)

झी मराठी वाहिनीवरील सर्वांची आवडती मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ.' या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, मायरा वायकुळ, अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांना तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. काही दिवसांपूर्वी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार होती. पण प्रेक्षकांच्या आग्रहाखातर मालिका एका नव्या वेळेत प्रदर्शित झाली. मात्र आता अखेर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या वेळेत एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

झी मराठी वाहिनीवर ‘३६ गुणी जोडी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे. मालिकेचा प्रोमो झळकला आणि चर्चा होऊ लागली ती मालिकेच्या विषयाबद्दल कारण या मालिकेची टॅग लाईनच आहे ‘प्रत्येक जोडी जुळत नसते.’ या मालिकेतील नायक नायिका विरुद्ध दृष्टिकोन असलेल्या दोन व्यक्ती आहेत.

वेदांत हा एक सुप्रसिद्ध तरुण, प्रस्थापित उद्योगपती आहे तो स्त्रीपेक्षा पुरुषांच्या सहवासाला प्राधान्य देतो कारण त्याचा असा विश्वास आहे की पुरुष स्त्रीपेक्षा अधिक सक्रिय, कार्यक्षम, तीक्ष्ण आणि मेहनती आहे. तर अमुल्याला डॉक्टर बनण्याची इच्छा असली तरी तिला हिमोफोबिया आहे. ती प्रेमळ, स्वैच्छिक, टॅलेंटेड आणि विनोदी असून ही तिच्या व्यक्तिमत्त्वाची मजबूत बाजू आहे. शशांक सोळंकी यांची निर्मिती असलेल्या या मालिकेचं लेखन अनिल देशमुख यांनी केलं असून, दिग्दर्शन हरीश शिर्के यांचं आहे.

या मालिकेच्या निमित्ताने अनुष्का सरकटे आणि आयुष संजीव ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, अनुष्का या मराठीवरील कारभारी लयभारी या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आली होती

IPL_Entry_Point

विभाग