मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Athiya Shetty-KL Rahul: अथिया आणि केएल राहुल करणार लग्न? सुनील शेट्टी म्हणाला...

Athiya Shetty-KL Rahul: अथिया आणि केएल राहुल करणार लग्न? सुनील शेट्टी म्हणाला...

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 20, 2022 12:15 PM IST

Athiya Shetty KL Rahul wedding: अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाच्या चर्चांवर अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया देत पूर्णविराम दिली आहे.

सुनील शेट्टी
सुनील शेट्टी (HT)

गेल्या काही दिवसांपासून अथिया शेट्टी आणि केएल राहुल तीन महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यांच्या विवाह सोहळ्याची जोरदार तयारी सुरु असून काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार असल्याचे म्हटले जात आहे. आता या सर्व चर्चांवर अथियाचे वडील, अभिनेता सुनील शेट्टीने प्रतिक्रिया देत पूर्णविराम दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सुनील शेट्टी लवकरच धारावी बँक या सीरिजमध्ये दिसणार आहे. त्यानिमित्ताने सुनील शेट्टीने एका वृत्तवाहिनीला मुलाखती दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याला केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सुनील शेट्टीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'आथिया आणि सुनील या लव्हबर्डच्या लग्नाच्या चर्चा रंगली आहे. हे दोघे लग्न कधी करणार?' असा प्रश्न सुनील शेट्टीला विचारण्यात आला होता.
वाचा: अजय देवगण ते अक्षय खन्ना; 'दृश्यम २'साठी कलाकारांनी किती घेतले मानधन?

सुनली शेट्टीने विचारलेल्या प्रश्नावर अगदी थोडक्यात 'लवकरच त्या दोघांचे लग्न होणार आहे' इतकच उत्तर दिले. पहिल्यांदाच सुनील शेट्टीने मुलगी अथिया आणि केएल राहुलच्या लग्नावर शिक्कामोर्तब केला आहे.

काही दिवसांपूर्वी शेट्टी कुटुंबीयांच्या जवळील व्यक्तीने एका वृत्तवाहिनीला माहिती दिली की, अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. दोघांच्या कुटुंबीयांना त्यांचे नाते मान्य आहे. त्यांना आनंद झाला आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटी हे कपल लग्न करणार आहेत.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे गेली तीन वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. आता डिसेंबर महिन्यात ते लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच दोघेही साऊथ इंडियन असल्यामुळे त्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाट साउथ इंडियन पद्धतीने पार पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

IPL_Entry_Point

विभाग