मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan : पठाणची तिकीटं फुकटात देशील का?; चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खान म्हणतो...

Pathaan : पठाणची तिकीटं फुकटात देशील का?; चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुख खान म्हणतो...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 22, 2023 09:04 AM IST

Ask SRK Session : शाहरुखने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर नुकतंच एक ‘आस्क एसारके’ सेशन ठेवलं होतं. या दरम्यान त्याने चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली.

pathaan
pathaan

Ask SRK Session : बॉलिवूडचा रोमान्स किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान हा आपल्या अभिनयानेच नाही तर, आपल्या काही कृतींमुळे देखील चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. नेहमी चाहत्यांशी संपर्कात राहणाच्या सवयीमुळे शाहरुख आणि त्याच्या फॅन्समध्ये एक घट्ट नातं निर्माण झालं आहे. अभिनेत्याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर नुकतंच एक ‘आस्क एसारके’ सेशन ठेवलं होतं. या दरम्यान त्याने चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने त्याला ‘पठाण’ची फुकट तिकीटं देशील का? असा प्रश्न केला.

ट्रेंडिंग न्यूज

शाहरुख खानच्या एका चाहत्याने सेशनमध्ये त्याला विचारले की, 'बुक माय शो क्रॅश झाले आहे. शाहरुख खान तुम्ही मला दोन तिकिटे देऊ शकता जेणेकरून मी पठाणचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहू शकेन?' याला उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला, 'नाही, तुम्हाला तिकीट विकत घ्यावे लागेल. बुक माय शो क्रॅश असो वा नसो...’. याचवेळी एका चाहत्याने शाहरुखला विचारले की, ‘पठाण कोणाला किस करणार?’ तर या प्रश्नावर उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला, ‘पठाण किस नाही किक करणार आहे.’ शाहरुखच्या उत्तरांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुख खान एका मोठ्या ब्रेकनंतर मोठ्या पडद्यावर परतत आहे. या आधी शाहरुख खानने गेल्या वर्षी काही चित्रपटांमध्ये कॅमिओ केला होता. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातही तो दिसला होता. याशिवाय त्याने आर माधवनच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’मध्ये एक छोटासा कॅमिओही केला होता. शाहरुख खानने रेड चिलीज या प्रोडक्शन हाउसमधून ‘डार्लिंग’सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘पठाण’ हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे. ‘पठाण’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित आणि २०२३मधील पहिला मोठा चित्रपट आहे.

IPL_Entry_Point